उस्मानाबाद – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती ३१ मे रोजी आहे. महाराष्ट्र शासनाने अहिल्यादेवींच्या कार्य कर्तुत्वाला उजाळा मिळावा जनसामान्यांना त्यांच्या कार्यातून प्रेरणा मिळावी यासाठी जयंती सर्व शासकीय कार्यालयात साजरी करण्यासंदर्भात परिपत्रक काढून आदेश दिले आहेत.मात्र या आदेशाची अंमलबजावणी अनेक शासकीय कार्यालयात होताना दिसत नाही ही दुर्दैवाची बाब असून शासकीय आदेशाचा भंग आहे. येत्या ३१ मे रोजी अहिल्यादेवींची जयंती असून ती साजरी न करणाऱ्यांवर कार्यवाही करावी तसेच जयंती साजरी करण्याच्या परिपत्रकाचे अनुपालन करण्याच्या संदर्भात आदेशित करावे अशी मागणी ओबीसी जनमोर्चाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन करण्यात आली आहे. यावेळी ओबीसी जनमोर्चाचे जिल्हाध्यक्ष सचिन शेंडगे, मध्यवर्ती अहिल्यादेवी जयंती उत्सव समितीचे अध्यक्ष लिंबराज डुकरे,ज्येष्ठ नेते ॲड.खंडेराव चौरे, माजी नगराध्यक्ष दत्ता बंडगर, बिभीषण लोकरे, इंद्रजित देवकते, अण्णा बंडगर,बालाजी तेरकर, श्याम तेरकर, श्रीकांत तेरकर,गणेश एडके, गणेश सोनटक्के, कुमार थोरात, बालाजी शेंडगे, मिमोह अडसूळ, अनिल ठोंबरे आदि उपस्थित होते.