राज्य सरकारने पेट्रोल वरील कर कमी केलाच नाही-भाजयुमो

0
64

 


उस्मानाबाद – राज्य सरकारने पेट्रोल डिझेल स्वस्त केल्याची घोषणा केली होती ती बोगस असल्याचा आरोप भारतीय जनता युवा मोर्चा ने केला आहे.

भाजपा युवा मोर्चा च्या वतीने राज्य सरकारद्वारे आकारण्यात येणाऱ्या इंधनावरील कर कमी करण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले या निवेदनात म्हटले आहे की जागतिक स्थरावर कच्या तेलाचे भाव हे गगनाला भिडलेले आहेत हे सर्वजण जाणतात पण असे असतांना सुद्धा देशातूल जनतेला महागाई पासुन दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने केंद्रीय उत्पादन शुल्कामधुन पट्रोलवर ८ रुपये आणि डिझेलवर ६ रूपये जनतेकरीता कर कमी केलेला आहे. यामुळे केंद्र सरकारला जवळपास २ लाख कोटींपेक्षा जास्तचा भार बसणार आहे. पण केवळ जनतेचे हित लक्षात घेता केंद्र सरकारने हे आक्रमक पाऊल उचलले. आजच्या घटकेले केंद्र सरकारचा कर हा १९ रुपये आकारते आहे व रु ३० कर हा राज्य सरकार आकारते आहे. महाराष्ट्र राज्य संपूर्ण देशामध्ये पेट्रोल व डिझेलवर सर्वात जास्त कर आकारणारे राज्य असुन जनतेच्या हितासाठी व महागाई कमी करण्यासाठी तत्काळ हे इंधनावरील कर कमी करण्यात यावे. संपूर्ण देशातील इतर राज्य १७-१८ रुपये कर आकारत असतांना महाराष्ट्र सरकारमधील महाविकास आघाडीने ऐव्हड्या मोठ्या प्रमाणात आकारण्यात आलेला कर हा जनतेवर होणारा घोर अन्याय आहे.

 राज्य सरकारद्वारे आकारण्यात येणारा इंधनावरील कर हा त्वरित कमी करण्यात यावा जेणेकरून महागाईला “आळा बसेल आणि जनतेला दिलासा मिळेल. जर का हे पाऊल येणाऱ्या ३ दिवसांमध्ये म्हणजेच ७२ तासांमध्ये उचलले नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फार मोठ्या प्रमाणावर आक्रामक आंदोलन करण्यात येईल आणि मग ज्या गोष्टी घडतील त्याला संपूर्णपणे महाविकास आघाडी जबाबदार असेल असा इशारा देण्यात आला आहे. या निवेदनावर जिल्हाध्यक्ष राजसिंहा निंबाळकर,अमोल नाईकवाडी,सागर दंडनाईक, ओंकार देवकते, हिम्मत भोसले,सुजित साळूंके, ज्ञानेश्वर पडवळ,धनराज नवले, अँड फूलदिपसिंग भोसले आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here