कवठेमहांकाळ, दि २७ (तानाजी शिंगाडे)
संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या कवठेमंहाकाळ विकास सोसायटी च्या निवडणुकीमध्ये माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे ,आमदार सुमनताई पाटील, अनिताताई सगरे ,यांच्या नेतृत्वाखालील महाकाली शेतकरी विकास पॅनल ने आठच्या आठ जागेवर एकतर्फी विजय मिळवला. या विजयानंतर माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांच्या समर्थकांनी गुलालाची उधळण व फटाक्यांच्या आतिषबाजी करत विजयी रॅली काढली. व जल्लोष साजरा केला .
याबाबत सविस्तर वृत्त असे की कवठेमंहाकाळ विकास सोसायटीची निवडणूक ही अपक्ष उमेदवारांनी चर्चेची केली होती. परंतु अजितराव घोरपडे यांचे नेतृत्व आणि माजी चेअरमन दिलीप झुरे यांचे काम या मुळे कवठेमंहाकाळ विकास सोसायटी वरती महांकाली शेतकरी विकास पॅनलचा झेंडा फडकला.
एकूण 13 जागेपैकी पाच जागा या बिनविरोध झाल्या होत्या. तर आठ जागांसाठी निवडणूक लागली होती माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे आमदार सुमनताई पाटील सुरेश भाऊ पाटील आणि अनिता ताई सगरे, शांतनु सगरे या सर्वांनी एकत्रित येत महांकाली शेतकरी विकास पॅनल आठ जागांसाठी निवडणूक रिंगणात उतरवले होते.
त्याच्या विरोधात अपक्षांनी मोट बांधत शेतकरी विकास पॅनल चे आठ उमेदवार रिंगणात उभे केले होते .
आज मतमोजणी व मतदान प्रक्रिया पार पडली. यामध्ये महाकाली शेतकरी विकास पॅनलचे आठच्या आठ उमेदवार निवडून आले.
या 13 पैकी आठ उमेदवार हे माजी मंत्री घोरपडे यांचे आहेत. तर आर आर पाटील गटाचे चार उमेदवार असून एक सगरे गटाचा उमेदवार आहे.
या कवठेमंहाकाळ विकास सोसायटी साठी बाराशे 22 मतदान झाले. त्यापैकी माजी चेअरमन दिलीप देशमुख यांनी 1031 एवढी विक्रमी मते घेतली. तर दुसऱ्या नंबर वरती तुकाराम संभाजी पाटील यांनी 950 मते घेतली तर दुसऱ्या नंबर वरती तुकाराम आबा पाटील यांनी 905 मते घेतली या तिन्ही उमेदवारांचे मताधिक्य पाचशे ते सहाशे च्या घरात आहे.
एकूणच कवठेमंहाकाळ विकास सोसायटी वर माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांनी आठ जागा आपल्या गटाकडे खेचत पुन्हा एकदा निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले आहे.
तर आमदार गटाला ही चार जागा मिळाल्या आहेत.आणि सगरे गटाला एक जागा मिळाली आहे.
विजयी उमेदवार असे- दिलीप भानुदास झुरे
(1031) ,
तुकाराम संभाजी पाटील(950),
तुकाराम आबा पाटील(908),
निखिल घाडगे(799),
अशोक पाटील (665),
बाळासाहेब पाटील
(799),
बंडू सूर्यवंशी(734),
दिनकर जाधव(866)
बिनविरोध उमेदवार असे– सुनील माळी,सुलोचना माळी,प्रकाश माने,काका बंडगर,पुष्पा पाटील.