उस्मानाबाद-31 मे
उस्मानाबाद शहराच्या सौंदर्यात भर घालणारे बसस्थानकासमोरील तुळजाभवानी शॉपिंग सेंटर मधील अंतर्गत रस्ता पूर्णपणे उखडल्याने या ठिकाणी दुचाकी चालवणे तसेच पायी चालणे देखील मुश्किल झाले आहे पावसाळ्यामध्ये या रस्त्याला दलदलीचे स्वरूप येते त्यामुळे हा रस्ता तात्पुरता का होईना तातडीने दुरुस्त करून द्यावा अशी मागणी तुळजाभवानी शॉपिंग सेंटर मधील गाळेधारकांनी आमदार कैलास दादा पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
बसस्थानकासमोरील श्री तुळजाभवानी शॉपिंग सेंटर येथील रस्ता गेल्या वीस वर्षापासून पूर्णता उखडून गेला आहे मागील पाच वर्षांपूर्वी या ठिकाणी खड्ड्यामध्ये मोठे दगड व मुरूम टाकून रस्ता तात्पुरता दुरुस्त करण्यात आला होता आता यातील मुरूम निघून गेला असून मोठाले दगड उघडे पडले आहेत यामुळे पायी चालणे तसेच दुचाकी चालवणे म्हणजे कसरत करावी लागते शिवाय धुळीचा ही मोठा त्रास ग्राहक आणि गाळेधारकांना होत आहे याबाबतचे निवेदन आज आमदार कैलास पाटील यांना देऊन याठिकाणी डांबरीकरण अथवा पेवर ब्लॉक टाकावे अशी विनंती केली.
यावेळी आ.कैलास दादा यांनी पावसाळ्यापूर्वी रस्ता दुरुस्तीचे आश्वासन दिले. शिवाय कायमस्वरुपी पक्का रस्ता लवकरच केला जाईल असे आश्वासित केले.
यावेळी तुळजाभवानी शॉपिंग सेंटरचे मुकेश नायगावकर व इतर गाळेधारक उपस्थित होते.