सलगरा,दि.३१(प्रतिनिधी)
तुळजापूर तालुक्यातील सलगरा (दि.) येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे शाखाधिकारी भास्कर किवडे हे १९८२ सालापासून ते आतापर्यंत केलेल्या ४० वर्षांच्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त झाल्याबद्दल दि.३१ मे रोजी त्यांचा उपस्थित बँकेचे कर्मचारी आणि मान्यवर यांच्या उपस्थितीत शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.१९८२ सालापासून ते आतापर्यंत उस्मानाबाद मुख्यालय, मुरूम, तुळजापूर, वाघोली, मंगरूळ, काटगाव आणि शेवटी सलगरा आदी ठिकाणी त्यांनी विविध पदं सांभाळत सेवा दिली आहे. गोरगरीब, वृद्ध, निराधार, शेतकरी सर्वसामान्य ग्राहकांशी प्रामाणिकपणे वागणे, मनमिळावू स्वभाव या मुळे ते पंचक्रोशीत परिचित होते. प्रामाणिकपणे आणि विश्वासाने काम करणे या बद्दल त्यांचे कौतुक करावे तितके कमीच आहे. असे मत बोलताना उपस्थितांनी व्यक्त केले.
या वेळी उत्तमराव लोमटे, लक्ष्मण शिंदे, अजित भागवत, रवी सुर्यवंशी, सुपेकर, जांभळे, पाटील, खोपडे, पवार, नवनाथ कोळी, पिराप्पा कोळी, भुजंग लोमटे, प्रताप मोरे, विक्रम गवारी, व्यंकट पवार, इरफान मुलानी, विशाल लोमटे, मतीन शेख, बाबुराव भोसले, संजय भोसले,
तसेच तुळजापूर शाखेसह विविध बँकेचे कर्मचारी आणि आदर्श व्यापारी मंडळ तुळजापूर यांच्या सह गावातील काही ग्रामस्थ उपस्थित होते.