उस्मानाबाद
500/- रु ची लाच मागणी केल्याप्रकरणी आरोपी लोकसेवक – श्री.श्रीकांत रामकृष्ण मगर, वय 46 वर्षे, नौकरी – कृषी सहायक, तालुका कृषी अधिकारी कार्यालय, उस्मानाबाद, सज्जा – सारोळा ता.जि. उस्मानाबाद यांच्यावर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे.
तक्रारदार यांचे आईचे मौजे सारोळा येथे असलेल्या शेतात शासनाचे MREGS या योजनेचे अंतर्गत सीताफळ लागवडीसाठी मिळणारे अनुदानाकरीता अर्ज दाखल केल्यानंतर एका मस्टरसाठी 500/- रुपये प्रमाणे जेवढे मस्टर होतील तेवढ्या मस्टरचे पैसे द्यावे लागतील असे म्हणून लाचमागणी केली. या प्रकरणात हॅश व्हॅल्यू घेण्यात आली आहे.
सापळा अधिकारी – प्रशांत संपते, पोलीस उप अधीक्षक, ला.प्र.वि.उस्मानाबाद यांनी काम पाहिले तर सापळा पथकात – पोलीस अंमलदार दिनकर उगलमूगले, इफ्तेकार शेख, विष्णू बेळे, नागेश शेरकर ला.प्र.वि. उस्मानाबाद यांचा समावेश होता.