लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त भाजपा कार्यालयात अभिवादन

0
50

 


उस्मानाबाद – लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त उस्मानाबाद येथे प्रतिष्ठान भवन भारतीय जनता पार्टी कार्यालयात आज (दि.3) अभिवादन करण्यात आले.

मराठवाड्याचे भूमिपुत्र असलेले गोपीनाथ मुंडे यांनी भारतीय जनता पार्टीचे नेतृत्व करीत असताना आमदार, खासदार, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री ते  केंद्रीय मंत्री अशी विविध पदे भूषवित असतानाच या पदांना साजेशी केलेली कामे आजही जनतेच्या स्मरणात आहेत.  3 जून 2014 रोजी नवी दिल्ली येथे एका अपघातात त्यांचे दुर्दैवी निधन झाल्यामुळे या लोकनेत्याला महाराष्ट्र मुकला. या महान लोकनेत्याच्या पावन स्मृतीला प्रतिष्ठान भवन भारतीय जनता पार्टी कार्यालयात अभिवादन करण्यात आले.

यावेळी भारतीय जनता पार्टीचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य अ‍ॅड. खंडेराव चौरे, भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंहा राजेनिंबाळकर, जेष्ठ नेते पांडुरंग लाटे, माजी नगराध्यक्ष सुनील काकडे, लक्ष्मण माने, अशोक उंबरे, शेषेराव उंबरे, गिरीष पानसरे, अमोल पेठे, बालाजी पवार, अनिल शिंदे, पुष्पकांत माळाळे, सुनील पंगुडवाले, महेश लांडगे, आदींसह भारतीय जनता पार्टी, युवा मोर्चा व विविध विभागाचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here