उस्मानाबाद – उतमी (का.), ता. उस्मानाबाद येथील भगवान बोंदर यांची बजाज डिस्कव्हर मोटारसायकल क्र. एम.एच. 25 एक्स 8707 ही दि. 20.04.2022 रोजी 23.00 वा. सु. उस्मानाबाद येथील सुनिल प्लाझा समोरुन अज्ञात व्यक्तीने चोरुन नेली होती. यावरुन बोंदर यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन आनंदनगर पो.ठा. येथे गुन्हा क्र. 121 / 2022 हा भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत नोंदवण्यात आला आहे.
गुन्हा तपासादरम्यान स्था.गु.शा. च्या पोनि- श्री. रामेश्वर खनाळ यांच्या मार्गदर्शनाखालील पोना- सय्यद, चव्हाण, सोनवणे, पोकॉ- आरसेवाड, कोळी, सहाणे यांच्या पथकाने मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पारधी पिढी, उस्मानाबाद येथील परमेश्वर चंदर काळे उर्फ सुरेश यांस दि. 02 जून रोजी नमूद मोटारसायकलसह ताब्यात घेतले आहे