उस्मानाबाद : ब्रम्हगाव, ता. वाशी येथील रानोजी भिमराव वायसे यांचा स्वराज कंपनीचा ट्रॅक्अर क्र. एम.एच. 45 ए 5304 हा दि. 04- 05 जून रोजी दरम्यानच्या रात्री अज्ञात व्यक्तीने चोरुन नेला होता. या प्रकरणी रानोजी वायसे यांनी दिलेल्या प्रथम खबरेवरुन दि. 09 जून रोजी रात्री 00.34 वा. वाशी पो.ठा. येथे गुन्हा क्र. 135 / 2022 हा भा.दं.सं. कलम- 379 अंतर्गत नोंदवण्यात आला आहे. गुन्हा तपासादरम्यान पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी व अपर पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या मार्गदर्शनाखाली स्था.गु.शा. च्या पोनि- रामेश्वर खनाळ, सपोनि- मनोज निलंगेकर, पोहेकॉ- अमोल निंबाळकर, विनोद जानराव, जावेद काझी, प्रकाश औताडे, धनंजय कवडे पोना- शौकत पठाण, अजित कवडे, नितीन जाधवर, शैला टेळे, यांच्या पथकास गोपनीय माहिती मिळाली की, तो ट्रॅक्टर उस्मानाबाद येथून जाणार आहे. यावर पथकाने सांजा चौकात सापळा लाउन बालाजी अरुण काळे व आत्माराम सुभाष काळे, दोघे रा. सरमकुंडी, ता. वाशी या दोघांना नमूद ट्रॅक्टरसह ताब्यात घेतले. पथकाने ट्रॅक्टरच्या ताबा- मालकी विषयी त्या दोघांना विचारणा केली असता ते पोलीसांना समाधानकारक उत्तरे देत नव्हते. यावर पथकाने त्या ट्रॅक्टरच्या इंजीन व सांगाडा क्रमांकाच्या आधारे तांत्रिक तपास केला असता तो ट्रॅक्टर उपरोक्त गुन्ह्यातील चोरीचा असल्याचे समजले. यावर पोलीसांनी गुन्ह्यातील नमूद ट्रॅक्टर जप्त करुन त्या दोघांना अटक केली असून गुन्ह्याचा उर्वरीत तपास चालू आहे.
चोरीच्या ट्रॅक्टरसह दोन आरोपी अटकेत
RELATED ARTICLES