प्रधानमंत्र्यांच्या उपस्थितीतील कार्यक्रमात विरोधी पक्षनेते बोलू शकतात मग उपमुख्यमंत्री का नाही? राष्ट्रवादीचा सवाल
उस्मानाबाद
संतांची भूमी असलेल्या श्रीक्षेत्र देहू येथे देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मंगळवार, दि. 14 जून रोजी झालेल्या शिळा लोकार्पणाच्या कार्यक्रमात महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना बोलण्यापासून रोखणार्या भाजपाचा उस्मानाबाद जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्यांनी तीव्र शब्दांत निषेध करुन जोरदार घोषणा दिल्या. केंद्र सरकारने प्रोटोकॉलच्या नावाखाली जाणीवपूर्वक हा प्रकार केल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकार्यांनी सांगितले.
संत तुकाराम महाराजांची भूमी श्रीक्षेत्र देहू येथे मंगळवारी प्रधानमंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या उपस्थितीत शिळा लोकार्पण कार्यक्रमात प्रधानमंत्र्यांच्या भाषणापूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाषणाची संधी देणे अपेक्षित होते. परंतु त्यांना भाषण करण्यापासून रोखण्याचा भारतीय जनता पार्टीचा हा डाव असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांमधून केला जात आहे.
यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर, प्रदेश सचिव मसूद शेख,जिल्हा उपाध्यक्ष कादर खान,वाजिद पठाण,जिल्हा सरचिटणीस नितीन बागल,महिला जिल्हाध्यक्ष मनीषा राखुंडे पाटील,उस्मानाबाद कळम विधानसभा अध्यक्ष अमित शिंदे,अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष असद पठाण,उद्योजक जिल्हा अध्यक्ष ॲड.विवेक घोगरे, उस्मानाबाद तालुका अध्यक्ष श्याम घोगरे,शहराध्यक्ष अयाज शेख,शहर कार्याध्यक्ष सचिन तावडे,नंदकुमार गवारे,शहर उपाध्यक्ष मनोज मुदगल,अनिकेत पाटील, राजकुमार पवार,अतुल आदमाने,मा.नगरसेवक खलिफा कुरेशी, मैनुद्दीन पठाण,इस्माईल शेख,बाबा मुजावर, शेखर घोडके,मीनील काकडे,जयंत देशमुख,मृत्युंजय बनसोडे,अमोल सुरवसे, अभिजीत व्हटकर,मजहर शेरकर,अजय कोळी, सौरभ देशमुख, आकाश वाघमारे,अमित बनसोडे, वैभव मोरे नारायण तुरुप,प्रेमचंद मुंडे,राजपाल दूधभाते,रणवीर इंगळे बिलाल तांबोळी,अतिक काजी,लईक सरकार, महेश नलावडे,महमूद मुजावर,यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, महिला, युवक व विविध कक्षाचे पदाधिकारी, कायकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
महाराष्ट्रातील जनतेचा अवमान
महाराष्ट्राची अस्मिता असलेले उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भाषणापासून रोखण्यात आले. केंद्राच्या प्रोटोकॉलच्या नावाखाली झालेला त्यांचा अवमान हा महाराष्ट्रातील बारा कोटी जनतेचा अवमान आहे. या घटनेला जबाबदार असलेल्या भारतीय जनता पार्टीचा आम्ही तीव्र निषेध करतो.
– अमित शिंदे
– उस्मानाबाद-कळंब विधानसभा अध्यक्ष
शिष्टाचाराची पायमल्ली
विधानसभेच्या विरोधी पक्षाच्या नेत्याला भाषणाची संधी दिली जाते परंतु उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना भाषण करण्यास मज्जाव करणे म्हणजे संविधानाची आणि शिष्टाचाराची पायमल्ली झालेली आहे. महाराष्ट्राचे राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे यांच्याबाबत सुद्धा विमानतळावर असाच प्रकार घडला आहे. या प्रकाराचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी निषेध करत आहे.
नितीन बागल
जिल्हा सरचिटणीस, राष्ट्रवादी काँग्रेस