उस्मानाबाद – तुळजापूर तालुक्यातील हिप्परगा ताड येथील ग्रामपंचायतीच्या १४ व्या वित्त आयोगातून कामे न करता ५ लाखापर्यंत चे निधी उचलला आहे. याची चौकशी करण्यात यावी यासाठी किरण रणदिवे ह्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसल्या आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, हिप्परगा ताड येथील ग्रामपंचायत मधील चौदाव्या वित्त आयोगातून विकास कामे न करता त्या कामाची कृती आराखड्यामध्ये सुध्दा कुठलाही उल्लेख नाही. १४ व्या आयोगाच्या खात्यावर शिल्लक रक्कम पाहून त्या कामाचे अंदाजपत्रक न बनविता व कुठल्याही प्रशासकीय मान्यता न घेता नेक्सा सोलर पाॅवर या कंपनीच्या नावावर दि २८ जुलै २०२१ ते २ सप्टेंबर २०२१ पर्यंत धनादेश द्वारे रुपये ५ लाखांपर्यंत चे व बिल सरपंच व ग्रामसेवक यांनी संगनमत करून शासकीय रकमेचा अपहार केलेला आहे. याबाबत गटविकास अधिकारी तुळजापूर यांना अर्जाद्वारे कळविले होते त्यांनी सुद्धा कोणतीही कारवाई केली नाही गेल्या पंधरा वर्षापासून असेच प्रकार होत आहेत नवीन सरपंच आल्यापासून तेही मागील सरपंचा प्रमाणे कामे न करता निधी हडप करत आहेत त्यामुळे हिप्परगा ताड विकासापासून वंचित राहिले आहे तरी अपहाराबाबत समितीने मिळून योग्य ती चौकशी करून अपहार करणार्या सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर योग्य ती करवाई करून तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी मागणी करण्यात येत असून त्यासाठी उपोषणाचा मार्ग अवलंबण्यात आला आहे.