उस्मानाबाद – जिल्हा विधीज्ञ मंडळाची वार्षिक निवडणूक दि ६ जुलै रोजी खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. या निवडणुकीत अध्यक्ष, उपाध्यक्ष गट अ व ब, सहसचिव गट अ व महिला प्रतिनिधी यांची निवडणूक घेण्यात आली होती या निवडणुकीत सचिव, कोषाध्यक्ष, सहसचिव गट ब व महिला प्रतिनिधी यांची निवड ही बिनविरोध करण्यात आली आहे या निवडणुकीत निवड आलेले जिल्हा विधीज्ञ मंडळाचे अध्यक्ष म्हणून सुधाकर मुंढे, उपाध्यक्ष गट अ अमोल गुंड,गट ब शिवाजी बाराते, सचिव प्रितीश उंबरे, कोषाध्यक्ष ललित चौधरी, सहसचिव गट अ स्वाती शिंदे(जोगडे),गट ब भैय्याजी साबणे,महिला प्रतिनिधी गट अ प्रतिक्षा मोरे,गट ब वैशाली वाटाणे या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे.
यात अध्यक्ष पदासाठी उभारलेले उमेदवार ॲड श्रीपत तावरे,ॲड सुधाकर मुंडे हे उभे होते , अध्यक्ष पदासाठी झालेल्या मतदानात एकूण वैध मतदान ५१५ अवैध मतदान ३. अध्यक्ष पदाची उमेदवार यात ॲड सुधाकर मुंडे हे विजयी झाले त्यांना २८९ मते मिळाली. पराभूत उमेदवार यांना २१८ मते मिळाली.यात ५ मते नोटाला मिळाली तर ५ मते बाद ठरविण्यात आली.
यात उपाध्यक्ष गट अ साठी तीन उमेदवार उभे राहिले होते यात ॲड आबासाहेब जाधव , ॲड अमोल गुंड,ॲड. इंद्रजित शिंदे हे उभे राहिले होते ॲड. जाधव यांना १९३ मते तर ॲड. गुंड यांना २७५ व ॲड शिंदे यांना ३५ मते मिळाली तर नोटाला ७ मते मिळाली तर ५ मते बाद ठरविण्यात आली.
उपाध्यक्ष ब गटासाठी उभारलेले उमेदवार ॲड शिवाजी बाराते,ॲड. ज्योती वाघे हे होते ॲड बाराते यांना ३९३ मते मिळाली तर ॲड वाघे यांना ११२ मते मिळाली तर नोटाला १० मते मिळाली.
सहसचिव गट अ उमेदवार ॲड स्वाती शिंदे व ॲड माधवी घोंगडे या होत्या ॲड स्वाती शिंदे यांना २४५ मते मिळाली तर ॲड घोंगडे यांना २३५ मते मिळाली तर नोटाला ३४ मते मिळाली तर १ मत बाद ठरविण्यात आले
महिला प्रतिनिधी गट अ उमेदवार म्हणून ॲड मायादेवी सरवदे ॲड प्रतिक्षा मोरे या उभ्या होत्या ॲड सरवदे यांना १९१ मते मिळाली तर ॲड मोरे यांना २९४ मते मिळाली असून यात नोटाला २१ मते मिळाली तर ९ मते बाद ठरविण्यात आले.