कुरुंदवाड : प्रतिनिधी
कुरुंदवाड येथिल सुनील भीमराव चव्हाण(वय.55) याचा पूर्ववैमनस्यातून कोयत्याने हात पाय तोडून खून केलेप्रकरणी कुरुंदवाडसह सांगली जिल्ह्यातील विटा येथील हद्दपार असलेले 10 संशयित आरोपींना अटक केली आहे. यातील एक आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती इचलकरंजीचे पोलीस उपअधीक्षक समीरसिंह साळवे यांनी दिली.
दरम्यान मित्राच्या गळ्याला झालेल्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी मित्रांनी मिळून हा खून केल्याची कबुली संशयित आरोपींनी दिल्याचे उपाध्यक्ष साळवे यांनी सांगितले.
कुरुंदवाड पोलिसांनी रविवारी रात्री आपली तपासाची चक्रे गतिमान करत 10तासात या खुनाचा छडा लावला.
याप्रकरणी राहूल किरण भबीरे,पवन नागेश कित्तुरे(दोघे रा.कुरुंदवाड), सागर अरविंद पवार,रितेश विकास खरात,रोहन किरण जावीर,अनिकेत दत्तात्रय ढवणे,तुषार तुकाराम भारंबल,सोहन माणिक ठोकळे(सहाजण रा.विटा ता. खानापूर जि. सांगली),शहाजान अलाबक्ष पठाण(रा.कृष्णानगर,
इचलकरंजी)यांच्याविरुद्ध कुरुंदवाड पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
यावेळी माहिती देताना उपअधीक्षक साळवे म्हणाले सण 2018 साली मयत सुनील चव्हाण हा नवबाग रस्त्यावर दुचाकी लावून पानपट्टीत पान घेण्यासाठी थांबला होता.त्यावेळी
संशयीत आरोपी राहुल भबिरे आणि मयत चव्हाण यांच्यात झालेल्या वादावादीत मयत चव्हाण याने संशयित आरोपी भबिरेच्या गळ्यावर कटरने वार केला होता.त्यावेळी गळ्याला झालेल्या दुखापतीचा राग मनात धरून संशयित आरोपी भबिरे याने आपल्या संशयित आरोपी मित्रांच्या मदतीने मयत चव्हाण याचा काटा काढण्याचा कट रचला होता.
संशयित आरोपी सागर पवारसह सातजणांनी नियोजित कटाप्रमाणे रविवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास मयत चव्हाण हा शेतात गवत कापण्यासाठी आला असता दबा धरून बसलेल्या 7 जणांनी मयत चव्हाण याच्या मांडीवर व डाव्या हातावर कोयत्याने जबरी वार करून गंभीर जखमी केले.यामध्ये त्याचा अतिरक्तस्त्राव झाला होता.त्याला नातेवाईकांनी सांगली येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते.मात्र उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितल्याचे उपाधीक्षक साळवी यांनी माहिती दिली.
माहिती देताना ते पुढे म्हणाले यातील संशयित आरोपीपैकी सागर पवार,रितेश खरात,रोहन जावीर यांच्यावर सांगली जिल्ह्यात गुन्हे दाखल आहेत. त्यांना हद्दपार करण्यात आले आहे. तर पवन कित्तुरे याच्यावर 4 फेब्रुवारी 2022 रोजी नागेश रुद्राप्पा वडर (वय 33 रा. बैलव्होंगल (कर्नाटक), जि. बेळगाव) या तरुणाला दारुच्या नशेत मारहाण केल्याने त्याचा मृत्यू झाल्याने खुनाचा गुन्हा दाखल असल्याचे सांगितले.
संशयित आरोपींना अटक करण्यासाठी पाठवण्यात आलेल्या पथकात सागर खाडे,शहाजी फोंडे,विवेक कराडे,राजेंद्र सानप, बाळासो कोळी,अनिल चव्हाण,ज्ञानदेव सानप, संतोष साबळे,अरुण नागरगोजे,शिरीष कांबळे,सचिन पुजारी,राम ओबासे, फारुख जमादार, पूजा आठवले,सर्जेराव माने,राहुल केंगार, सुप्रिया सावगावे,अमित पवार आदी सहभागी झाले होते.
चप्पल वरून खुणाचा छडा,सीसीटीव्हीची अनमोल मदत.
रविवारी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास मयत चव्हाण हा शेताकडे घोडा गाडी घेऊन जात असतानाचे त्याच्या काही तासापूर्वी संशयित आरोपी हे दुचाकीवरून ट्रिपल सीट जात असल्याचे चित्रीकरण पाहिले असता यातील संशयित आरोपी आणि घटनास्थळी मिळून आलेल्या चप्पल वरून आरोपी पर्यंत पोहचण्यासाठी धागेदोरे हाती लागल्याचे उपअधीक्षक साळवे यांनी सांगितले.