उस्मानाबाद –
लोहारा पोलीस स्टेशन येथील पोलीस नाईक गोरोबा बाबासाहेब इंगळे , वय 35 वर्षे हे २० हजाराची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागा जाळ्यात सापडले आहेत. याबाबत माहिती अशी की,तक्रारदार यांचे विरुद्ध पो. स्टे. लोहारा येथे दाखल असलेल्या गुन्ह्यात त्यांना अटक न करणे, लॉकअप मध्ये न टाकणे, चार्जशीट न पाठवणे व फायनल पाठवणे यासाठी यातील लोकसेवकाने तक्रारदार यांच्याकडे दिनांक 03.08.2022 रोजी 25000/- रुपये लाच रकमेची मागणी करून तडजोडी अंती 20,000/- रुपयांची मागणी करून दिनांक 04.08.2022रोजी 20,000/- रुपये लाच रक्कम पंचासमक्ष स्विकारली. सापळा अधिकारी म्हणून प्रशांत संपते , पोलीस उप अधीक्षक,ला.प्र. वि. यांनी काम पाहिले तर सापळा पथकात पोलीस अंमलदार इफ्तेकार शेख, दिनकर उगलमूगले ,विष्णू बेळे , जाकेर काझी यांनी काम पाहिले.सदरची कारवाई लोहारा ते जेवळी रोडवर एच पी पेट्रोल पंपाजवळ आज दि.4/8/22 रोजीचे 10:55 वाजता करण्यात आली असून यासंबंधाने पो स्टे लोहारा येथे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया चालू आहे.