back to top
Sunday, December 22, 2024
Google search engine
Homeताज्या बातम्यापरंडा तालुक्यातील चांदणी तलाव तुडुंब भरला

परंडा तालुक्यातील चांदणी तलाव तुडुंब भरला

परंडा तालुक्यातील पिंपळवाडी येथील चांदणी तलाव तुडुंब भरला असून एक दरवाजा उघडण्यात आला आहे. परंडा तालुक्यातील सीना-कोळेगाव प्रकल्पानंतर चांदणी प्रकल्प हा दुसऱ्या क्रमांकाचा मोठा प्रकल्प असून त्याची साठवण क्षमता 23.78 दशलक्ष घनमीटर आहे. प्रकल्पावर पिंपळवाडी, वाकडी, दहिटणा, बोडखा, घारगाव, आसू, ब्रह्मगाव सरणवाडी या गावांसह परिसरातील बहुतांश शेतकऱ्यांची शेती  तसेच बार्शी शहराचा पाणी पुरवठा अवलंबून आहे तसेच गतवर्षीपेक्षा यावर्षी धरण लवकर भरल्याने शेतकऱ्यांबरोबर सर्वसामान्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे चांदणी धरणास 28 स्वयंचलित दरवाजे असून त्यापैकी एक दरवाजा काल दिनांक  9 रोजी  सकाळी10 वाजता उघडला आहे, त्यामुळे धरणाच्या या दरवाजातून 211.63 क्युसेक ने पाण्याचा विसर्ग होत आहे वाढती पाण्याची पातळी लक्षात घेता गावकरी यांना  सतर्कतेचा इशारा दिलेला असुन अजुन दरवाजे उघडण्याची शक्यता आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments