३ हजाराची लाच घेताना रंगेहात पकडले लाचखोर कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ
परंडा (प्रतिनिधी) परंडा पंचायत समीती चे विस्तार आधिकारी भागवत जोगदंड व ग्राम विकास अधिकारी मधुकर जाधव यांना ३ हजाराची लाच घेताना गुरुवार दि १९ ऑक्टोबर रोजी लाचलुचपत विरोधी पथकाने रंगेहात पकडले आहे या मुळे परंडा पंचायत समीती च्या कर्मचाऱ्या मध्ये खळबळ उडाली आहे.
या बाबत आधिक माहिती अशी की, यातील तक्रार यांच्या वाकडी शिवारातील शेत गट नंबर ३३२ मधील ३५ गुंठे जमिनिपैकी २ गुंठे जमिनीवर मारूती सोनमाळी यांनी
बेकायदेशीर अतिक्रमण करून ग्रामपंचायत पातळीवर ८ अ मध्ये मारुती सोनमाळी याचे नावे बोगस नोंद करून घेतलेली होती.
या जागेवरील बोगस नोंद कमी करून देण्या साठी तक्रारदार यांनी अर्ज दाखल केला होता.या प्रकरणी विस्तार अधिकारी जोगदंड यांनी अहवाल सादर करण्या साठी ग्रामविकास आधिकारी जाधव यांच्या मार्फत ५ हजाराची मागणी करून ३ हजार रुपये या पुर्वीच स्वीकारले होते.राहिलेले २ हजाराची लाच दि १९ ऑक्टोबर रोजी दुपारी पंचायत समीतीच्या परिसरातील हॉटेल मध्ये पंचा समक्ष स्वीकारताना लाच लुचपत विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले.दोन्ही आरोपीस ताब्यात घेण्यात आले असुन परंडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लाच लुचपत प्रतिबंधक औरंगाबाद विभागाचे पोलिस आधिक्षक संदिप आटोळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप अधिक्षक सिध्दाराम म्हेत्रे यांच्या नेतृत्वा खाली सापळा अधिकारी – विकास राठोड, पोलीस निरीक्षक पोलीस अंमलदार इफतीकार शेख,विष्णू बेळे,विशाल डोके यांच्या पथकाने कारवाई केली.
लोकसेवक अथवा त्यांच्या वतीने कोणी खाजगी व्यक्ती कायदेशीर काम करून देण्यासाठी लाचेची मागणी करत असेल संपर्क साधावा असे अवाहन पो.उप अधिक्षक सिद्धराम म्हेत्रे यांनी केले आहे.