पाडोळी( प्रतिनिधी)
उस्मानाबाद तालुक्यातील बेंबळी पोलीस ठाण्या मध्ये आज (दि.२७) शांतता कमिटीची बैठक संपन्न झाली.
यामध्ये बेंबळी पोलीस ठाण्या अंतर्गत असलेल्या सर्वच्या सर्व गावच्या पोलीस पाटील, पोलीस कर्मचारी,ग्रामसेवक, कमिटी मधील सदस्य महावितरणचे अधिकारी आदी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यामुळे उपविभागीय पोलीस अधिकारी श्री कल्याणजी घेटे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले, यावेळी आगामी गणेशोत्सवाच्या काळात गणेश मंडळानी कायद्याचे पालन करून उत्सव साजरा करणे बाबत ही मार्गदर्शन केले, यावेळी खेड्या पाड्यातून आलेल्या सर्व शांतता कमिटी मधील सदस्याच्या अडीअडचणी जाणून घेतल्या आणि या बैठकीचा मुख्य उद्देश हा आगामी गणेश उत्सव शांततेत पार पाडणे बाबत सूचना दिल्या, शासनाने ज्या मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत त्याचे पालन करावे, एक गाव एक गणपती करण्यासाठी बेंबळी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री मच्छिंद्र शेंडगे केले आहे, यावेळी मोठ्या संख्येने शांतता कमिटीचे सदस्य, गणेश मंडळाचे सदस्य, ग्रामसेवक, पोलीस पाटील आदी लोक उपस्थित होते.