रा.गे शिंदे गुरुजी यांच्या जन्मोत्सवानिमित्त महाविद्यालयामध्ये भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन

0
49

 

 

 परांडा (भजनदास गुडे) परंडा येथील श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ उस्मानाबाद संचलित शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे शिंदे महाविद्यालय परंडा या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष रा गे शिंदे गुरुजी यांच्या ९९ व्या जन्मोत्सवानिमित्त महाविद्यालयामध्ये भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.दि१सप्टेंबर ते ७सप्टेंबर दरम्यान जयंती सोहळा सप्ताह साजरा करण्यात येत आहे. अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनील जाधव यांनी दिली आहे.    

         जयंती उत्सवानिमित्त श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ उस्मानाबाद या संस्थेचे अध्यक्ष सुनील नाना शिंदे,सचिव संजय बाप्पा निंबाळकर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.  

       महाविद्यालयामध्ये दि. १ ते ७ सप्टेंबर दरम्यान प्रबोधनाचा कार्यक्रम प्रसिद्ध प्रबोधनकार देवा चव्हाण, रांगोळी स्पर्धा,विज्ञान प्रदर्शन, पोस्टर प्रदर्शन,रक्तदान शिबिर आणि व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. 

      कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनील जाधव हे उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत.त्यांच्या नेतृत्वाखाली सदर कार्यक्रम आयोजित केला आहे.    या कार्यक्रमाच्या अनुषंगाने रांगोळी स्पर्धा मध्ये प्रथम पारितोषिक १५०१ रुपये रोख रक्कम,सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र. द्वितीय पारितोषिक १००१ रुपये रोख रक्कम,सन्मान चिन्ह व प्रमाणपत्र तर तृतीय पारितोषिक ७०१ रुपये रोख, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र तसेच विज्ञान प्रदर्शन स्पर्धेमध्ये प्रथम द्वितीय आणि तृतीय पारितोषिक वरील प्रमाणे असेल आणि पोस्टर प्रदर्शन मध्ये प्रथम पारितोषिक १००१ रुपये रोख व प्रमाणपत्र, द्वितीय पारितोषिक ७०१ रुपये रोख रक्कम व प्रमाणपत्र आणि तृतीय पारितोषिक ५०१रुपये रोख व प्रमाणपत्र अशा पद्धतीने विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी त्यांना पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.

         जयंती उत्सवामध्ये महाविद्यालयातील प्रा.डॉ हरिश्चंद्र गायकवाड, देवा चव्हाण बार्शी, प्रा दत्तात्रेय मुळीक,प्रा एस के गायकवाड, प्रा डॉ.शहाजी चंदनशिवे यांची व्याख्याने आयोजित करण्यात आली आहेत जयंती उत्सवानिमित्त महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले आहे. महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धेमध्ये सहभाग घ्यावा व कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आवाहन प्राचार्य डॉ सुनील जाधव यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here