उस्मानाबाद – राज्याचे विरोधीपक्षनेते अजित पवार यांच्या मेजवाणीसाठी बाजारपेठेतील कठडे तोडण्याचा प्रकार घडला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की , तडवळा येथील राष्ट्रवादीचे नेत्यांनी आज अजित पवार यांच्या उपस्थितीत शेतकरी मेळावा आयोजित केला असून मेळाव्यापूर्वी ते तडवळा येथील राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या घरी स्नेहभोजन करणार आहेत. तिथे जाण्यासाठी जाणारा मार्ग गावातील बाजारपेठेतून जाणारा आहे. पोलिसांनी धोकादायक स्थितीत असलेली वाहने रस्त्यावर रहदारीस अडथळा निर्माण करणारे ढिगारे, आठवडा बाजारातील वाहन व इ. हे रस्त्यावरुन बाजुला करुन घ्यावे असे पत्र ग्रामपंचायतीला दिले असल्याने त्याच्या आधारे त्यांनी शेतकऱ्यांना गावातील बाजारपेठेत भाजी विक्रीसाठी तयार करण्यात आलेले कठडे तोडण्यात आले आहेत. अजित पवार हे माजी अर्थमंत्री आहेत कोरोना काळात त्यांनी राज्याचे आर्थिक नियोजन योग्य केले आहे त्यांना पैश्याचा अपव्यव केलेला आवडत नाही हे अनेकदा दिसून आले आहे मात्र त्यांच्याच दौऱ्यासाठी सरकारी पैशातून शेतकऱ्यांसाठी तयार केलेले कठडे तोडणे त्यांना तरी आवडेल का? शेतकऱ्यांची गैरसोय करून नेत्यांना घरी नेणे आणि शेतकऱ्यांसाठी शेतकरी मेळावा आयोजित करणे हे जनतेच्या मनाला न पटणारे आहे. गावातील शेतकऱ्यांनी उद्या भाजी विक्रीसाठी कुठे बसायचे? तोडलेले कठडे किती दिवसात पूर्ववत केले जातील? त्याचा खर्च गाव नेत्यांच्या खिशातून करायचा की ग्रामपंचायतीने? असे प्रश्न गावातील नागरिकांना पडत आहे. कामात कसर केली म्हणून अधिकाऱ्यांना खडे बोल सूनवणनारे विरोधीपक्षनेते गाव नेत्यांना खडसावतील का? असा प्रश्न शेतकऱ्यांना चर्चिला जात आहे.