परंडा (भजनदास गुडे) आयाण – बाणगंगा सहकारी साखर कारखाना ऊस उत्पादक शेतकऱ्यांना जिल्ह्यतील इतर कारखाण्या पेक्षा जादा दर देणार असल्याचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते तथा विरोधी पक्षनेते आजीतदादा पवार यांनी जाहीर केले.
दि१ ऑक्टोबर रोजी ईडा / जवळा (नि) येथील आयाण- बाणगंगा सहकारी साखर कारखाणास्थळी चेरमन मा.आ.राहूल मोटे यांनी ऊस उत्पादक शेतकरी मेळाव्याचे आयोजन केले होते.
या मेळाव्यासाठी उपस्थीत शेतकऱ्यांना संबोधीत करताना विरोधी पक्षनेते अजितदादा पवार म्हणाले परिपक्कव व चांगल्या प्रतीचा ऊस कारखाण्यालाद्या जिल्ह्यतील इतर कारखाण्या पेक्षा जास्त दर देतो असे जाहीर केले.
पुढे बोलताना पवार म्हणाले रिकव्हरी कमी करायचे,काटा हाणायचे धंदे आम्ही करत नाही. आमच्या कारखान्यात ऊस आणायच्या आधी कुठल्याही सरकार मान्यता प्राप्त वजन काट्यावर गाडी उभी करून वजन करून आणा यात किलोचा देखील फरक पडणार नाही याची हमी देतो.राहुल मोटे यांनी मला सांगितलं की आपल्या कारखाण्याची ऊस गाळप क्षमता कमी असल्या कारणाने खूप उस उत्पादक शेतकऱ्यांना इच्छा असून देखील आयाण – बाणगंगा कारखान्यात ऊस घालता आला नाही.त्यामुळे कारखान्याची गाळप क्षमता ४००० टनावरुन ७००० टन परडे करण्याचा निर्णय कारखान्याने घेतला आहे.
ऊसाला भाव आणखी कसा जास्त देता येईल यासाठी कोणते जनरेशन लागणार आहे.तेव्हा लवकरच आपण कारखान्याची डिस्टलरी चालू करत आहोत.ज्याच्या माध्यमातून परडे ४ लाख लिटर इथेनॉलचे उत्पादन कारखाना करू शकेल.सोबतच ३२ मेगावॅटचा वीजनिर्मिती प्रकल्प या ठीकाणी उभारण्याची घोषणा यावेळी पवार यांनी केली.
परिसरातील शेतकऱ्यांनी देखील आता दर्जेदार ऊस उत्पादनाकडे लक्ष दिले पाहिजे. ऊस दर्जेदार असेल तर रिकव्हरी चांगली मिळते अन भाव पण चांगला देता येतो.त्यासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट च्या माध्यमातून आपल्या भागात ऊसाच्या लागवडीसाठी,नवीन उस बेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात येतील.तसेच गतवर्षी गाळप केलेल्या उसास प्रतिटन २४५१/- रुपयाचा दर देण्यात आला आहे.भविष्यात जादा दर मीळावा यासाठी उस उत्पादक शेतकऱ्यांनी २६५ व्हरायटी उसाच्या ऐवजी ८६०३२,१०००१,१२१२१, ८००५ व्हरायटीच्या उसाची अडसाली उस लागवड करुण जास्ती जास्त उत्पादण घेउन कारखाण्याकडून जास्तीचा दर घ्यावा अशे उस उत्पादक शेतकऱ्यांना पवार यांनी अवहान कले.
कारखाना परिसरात लवकरच वसाहत निर्मितीसाठी काम चालू होणार आहे.त्या माध्येमातून कामगारांना राहायला दर्जेदार घरं लवकरच उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. कारखाणा साईटवर आल्यापासून सगळे नुसते माझेच फोटो काढतायत.कारखान्याचे व कारखाना परिसराचे पण फोटो काढून घ्या.कारण पुढच्या एक वर्षात तुम्हाला कारखाना परिसरात आमूलाग्र बदल झालेला दिसेल असे पवार यांनी सांगीतले.
तसेच उसतोड करताना कसलीही वशीलेबाजी चालणार नाही ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी ऊसतोडणी साठी घाई करू नये नियमामुसार उस तोडणी साठी कारखाना कर्मचारी आपणाला ऊसतोडीची तारीख आली की ऊसतोड टोळी देऊन उसतोड सुरु करतील असे हि पवार म्हणाले.
या वेळी राहूल मोटे,रणजित मोटे,शिवाजीराव गाढवे, तात्यासाहेब गोरे,मधूकर मोटे,वैशालीताई मोटे, सक्षणा सलगर, स्वाती गायकवाड, जनरल मॅनेजर संतोष तोंडले,मुख्य शेती आधिकारी विठ्ठल मोरे,चिफ इंजिनिअर राजकुमार शिदे,चिफ अकॉंटंट विशाल सरवदे,स्टोअर किपर नानासाहेब जाधव,दादासाहेब पाटील, ॲड.संदिप पाटील,हनुमंत पाटूळे, महादेव खैरे,मा.नगर अध्यक्ष जाकीर सौदागर,नवनाथ जगताप,दत्ता पाटील,भाऊसाहेब खरसडे,हनुमंत कोलते,आशोक पाडुळे,राहूल बनसोडे,बापू मिस्कीन,ॲड सुभाष वेताळ,महेश खुळे,संजय घाडगे, गोविद जाधव, पंकज पाटील, ॲड.नितीन शिदे, सचिन पाटील, हनुमंत कातूरे,रवि मोरे,रविद्र जगताप,मलीक शेख,हनुमंत गायकवाड,अतुल गोफणे,तुषार गोफणे,रोहीदास गोफणे यांच्यासह शेतकरी,वाहाण मालक,वाहातुक ठेकेदार,कारखाना अधिकारी कर्मचारी उपस्थीत होते.
कार्यक्रमाचे प्रास्तावीक कारखाण्याचे चेअरमन मा.आ.राहूल मोटे यांनी केले तर सुत्र संचलन बाबूराव काळे यांनी केले.