धाराशिव : धाराशिव जिल्ह्यात दरोड्याच्या तयारीत असलेले तीन संशयित इसम स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाच्या कारवाईत अटकेत आले. त्यांच्या ताब्यातून गावठी बनावटीचे पिस्तूल, कोयता, जिवंत काडतुसे, चारचाकी व दुचाकी वाहनांसह सुमारे ५ लाख ५ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मा. पोलीस अधीक्षक रितु खोखर व अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या आदेशानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल मोरे, सचिन खटके व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.
दि. १७ जून रोजी सायंकाळी साडेसातच्या सुमारास पथक पेट्रोलिंग करीत असताना तेरणा कॉलेजजवळील विमानतळ रस्त्यावर काही संशयित इसम एका कार व तीन दुचाक्यांसह थांबले असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने घटनास्थळी जाऊन शासकीय वाहन काही अंतरावर थांबवून पायी तपासणी सुरू केली. पोलिसांना पाहताच दोघे इसम दुचाकीवरून पळून गेले. मात्र, उरलेले तीन संशयित ताब्यात घेतले.
त्यांची नावे पुढीलप्रमाणे :
- धुपकिरण उर्फ अनिलशेट रामलगन चौधरी (वय 47, रा. अरिवला, ता. भानपुर, जि. बस्ती, उत्तर प्रदेश)
- निलेश उर्फ कांचन संभाजी चव्हाण (वय 32, रा. काकानगर, धाराशिव)
- मुकेश शाम शिंदे (वय 24, रा. शिंगोली, धाराशिव)
त्यांच्याकडून ७५ हजार रुपये किमतीचे गावठी पिस्तूल, तीन जिवंत काडतुसे, लोखंडी कोयता, २.३० लाख किमतीची ह्युंडाई सॅंट्रो कार, १.५५ लाख किमतीची बुलेट मोटरसायकल आणि ४५ हजार किमतीची होंडा ॲक्टीवा स्कूटर असा एकूण ५ लाख ५ हजार ८०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
अटक केलेल्या तिघांविरुद्ध धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोहेकॉ विनोद जानराव, समाधान वाघमारे, नितीन जाधवर, पोलीस नाईक बबन जाधवर, चालक पोहेकॉ महेबुब अरब, पोलीस का. विनायक दहीहांडे व प्रकाश बोईनवाड यांच्या सहभागातून पार पडली.
- तुळजापूरातील ब्रह्मदेव मूर्ती दुभंगल्याप्रकरणी संताप: हिंदुत्वनिष्ठ संघटनांची एकमुखी मागणी – दोषी अधिकाऱ्यांवर तात्काळ गुन्हे दाखल करा!
- दखलपात्र गुन्हा न दाखल केल्याने माय-लेकराची टोकाची कृती; पोलिस ठाण्यातच घेतले विष
- आषाढी एकादशीचा भक्तिभावाने उत्सव; गाढवे दांपत्याच्या हस्ते विठ्ठल रखुमाईची महापूजा
- सिरसाव ग्रामपंचायतीतील ७.५७ लाख रुपयांचा अपहार उघड | गटविकास अधिकाऱ्यांनी सहा जणांना नोटीस बजावली
- गंगाधर ही शक्तिमान है! पिडीत निघाला आरोपी