पालकमंत्री प्रा.तानाजीराव सावंत यांच्या हस्ते १८ कोटी रु रस्ता कामाचे भुमीपुजन
रस्त्याचे काम त्वरीत सुरू करा निधी कमीपडू देणार नाही – प्रा.तानाजीराव सावंत.
महाआरोग्य शिबीर स्थळाची मंत्री सावंत यांनी केली पाहणी
परंडा (भजनदास गुडे) परंडा शहरातील पोलिस स्टेशन ते एस टी स्टॅन्ड पर्यतच्या मुख्यरस्ता कामाचे भुमी पुजन आरोग्य मंत्री तथा पालकमंत्री प्रा.तानाजीराव सावंत यांच्या हस्ते दि १९ नोहेंबर रोजी सकाळी करण्यात आले.
गेल्या अनेक वर्षा पासुन पोलिस स्टेशन ते एस.टी स्टॅन्ड पर्यतचा रस्ता खराब होऊन मोठ मोठे खड्डे पडल्याने पदचारी व वाहण धारकांना प्रवास करताना मोठा त्रास सहन करावा लागत होता.रस्ताचे काम करण्यात यावे आशी मागणी शहरातील नागरीकांच्या वतीने कित्तेक वर्षापासून करण्यात येत होती. मात्र रस्ताचे काम होत नव्हते अखेर आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री प्रा.तानाजी सावंत यांनी शहरातील नागरीकांच्या मागणीची दखल घेत सदर सस्ता कामासाठी तब्बल १८ कोटीचा निधी मंजूर करून प्रत्यक्ष कामाचे भूमी पूजन करून शहरातील नागरीकांच्या रस्ता दुरुस्तीच्या मागणीची पुरतता केली आहे. शहरातील मुख्य रस्त्याचा प्रश्न मार्गी लागल्यामुळे शहरातील नागरीकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
पोलिस स्टेशन ते टिपू सुलतान चौका पर्यंत रस्ताची रुंदी २० मीटरची असुन डिवाईडर करण्यात येणार आहे तर टिपू सुलतान चौक ते एसटी स्टॅन्ड पर्यंत विना डिवाईडर चा रस्ता करण्यात येणार आहे संपुर्ण रस्ता सिमेंट कॉक्रीटचा करण्यात येणार असल्याची माहाती मुख्याधिकारी मनिषा वडेपल्ली यांनी यावेळी दिली.
दि २७ नोव्हेंबर रोजी परंडा शहरातील कोटला मैदानावर महा आरोग्य शिबीर घेण्यात येणार आहे.या महाआरोग्य शिबीराची जय्यत तयारी करण्यात येत असून या शिबीरात सर्व रोगा वरील तज्ञ डॉक्टरा मार्फत मोफत तपासणी व उपचार करण्यात येणार आहे.
ज्या रुग्णावर शस्त्रक्रिया करण्याची गरज असेल अश्या सर्व रुग्णावर सर्व प्रकार च्या शास्त्रक्रिया ज्या ठिकाणी सुविधा उपलब्ध असेल त्या ठिकाणी करण्यात येणार आहे तसेच रुग्णाना ये जा करण्यासाठी वाहनांची मोफत व्यावस्था करण्यात येणार आहे.
या शिबीर स्थळाला आरोग्य मंत्री तथा पालकमंत्री डॉ.तानाजीराव सावंत यांनी भेट.देऊन शिबीर स्थळाची पाहणी केली व आरोग्य आधिकारी यांच्या कडून अढावा घेतला.या महाआरोग्य शिबीराचा जिल्हया सह परिसरातील रूग्यांना लाभ होणार आहे .
मंत्री डॉ तानाजीराव सावंत यांचा दि १९ नोहेंबर रोजीचा परंडा दौरा महत्वाचा ठरला असुन अनेक वर्षापासुन रखडलेल्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लागला आहे.एका महिन्यात रस्त्यांचे काम पुर्ण करा निधी कमी पडू दिला जानार नाही असे सावंत यांनी भुमी पुजन प्रसंगी सांगीतले.
यावेळी उप विभागीय अधिकारी रोहिणी नऱ्हे, जिल्हाशल्य चिकत्सक राज गलांडे,जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ कुलदिप मेटकरी, तहसिलदार रेणूकादास देवणीकर, पोलिस निरिक्षक सुनिल गिड्डे,पोलीस उपनिरीक्षक विक्रांत हिगे,नायब तहसिलदार सुजित वाबळे,प्रदिप पाडुळे,मुख्याधिकारी मनिषा वडेपल्ली,वैद्यकीय अधिक्षक डॉ.विश्ववेश कुलकर्णी,तालूका आरोग्य अधिकारी विनयशील कुलकर्णी,डॉ अबरार पठाण,डॉ देवदत्त कुलकर्णी, डॉ.अमजद पठाण, डॉ.धनाजी जाधव यांच्या सह जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत,जिल्हा परिषदेचे माजी कृषी व पशू सवंर्धन सभापती दत्ता साळुंके, माजी नगर अध्यक्ष जाकीर सौदागर,मा.नगरध्यक्ष सुभाषसिह सद्दिवाल,आरपीआयचे प्रदेश चिटनीस संजयकुमार बनसोडे,विकासरत्न प्रा.तानाजीराव सावंत प्रतिष्ठाणचे अध्यक्ष रामचंद्र घोगरे,शिवसेना तालूका प्रमुख आण्णासाहेब जाधव,सतिष दैन,मा.नगरशेवक रत्नकांत शिंदे,ढागपिपरी सरपंच आशोक गरड,मा.उपनगरध्यक्ष संतोष मोरे,मा.नगरशेवक बाळासाहेब गायकवाड, मा.नगरशेवक संजय घाडगे, मा.पंचायत समीती सदस्य गुलाब शिदे,शिवसेना शहरप्रमुख वैभव पवार,सतीश मेहेर,अनिल देशमुख जयदेव गोफणे,तानाजी कोलते,पिंटू सांगडे,शब्बीर पठाण, समीर पठाण,जमील बाळाभाई, विजयकुमार बनसोडे,धिरज ठाकुर यांच्या सह कार्यकर्ते मोठया संखेने उपस्थित होते.