परंडा – (प्रतिनिधी)परंडा तालुक्यातील पिंपरखेड येथील ग्लोबल एज्युकेशनल इन्स्टिट्युट मध्ये संविधान दिन साजरा करण्यात आला.भारतीय संविधान आणि घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सन्मानार्थ भारतीय संविधान दिन साजरा केला जातो.भारत सरकारने आंबेडकरांचे १२५ वे जयंती वर्ष साजरे केले जात असताना त्यांना एक प्रकारची श्रद्धांजली वाहण्यासाठी २६ नोव्हेंबर २०१५ रोजी पहिला अधिकृत संविधान दिन साजरा केला.
संविधानाबाबत जनजगृती करण्यासाठी आणि डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार करण्याच्या उद्देशाने देशभरात २६ नोव्हेंबर हा दिवस ‘संविधान दिन’ म्हणून साजरा केला जातो.महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने २४ नोव्हेंबर २००८ ला आदेश काढून ‘२६ नोव्हेंबर’ हा दिवस संविधान दिन म्हणून साजरा करण्याचे घोषित केले होते.
चहा विकणारा सुद्धा पंतप्रधान होऊ शकतो हि संविधानाची ताकत आहे हे विसरून चालणार नाही.तसेच संविधानामुळेच महिलांना सन्मानाची वागणूक आणि हक्क मिळाला आहे. क्रांतीसुर्य महात्मा फुले व छत्रपती शिवाजी महाराज यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिले.ग्लोबल शाळेतील मुलांना संविधानाचे महत्व व त्याचा अभ्यास होण्यासाठी प्रार्थनेच्या वेळी दररोज मुलांकडून संविधान म्हणवून घेतले जाते हे विशेष.
तसेच मुंबई येथे २६/११ च्या झालेल्या भ्याड हल्ल्यात शहीद झालेल्या वीरांना आदरांजली वाहण्यात आली यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिवश्री गोरख मोरजकर यांनी डॉ.बाबासाहेब आंबडेकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालुन अभिवादन केले तसेच यावेळी संस्थेच्या सचिवा तथा जिजाऊ ब्रिगेड जिल्हाध्यक्षा शिवमती आशाताई मोरजकर म्हणल्या की ,२६ नोव्हे.२००८ रोजी झालेल्या भीषण दहशतवादी हल्लामध्ये ३४ विदेशी नागरिकांसह एकुण १६६ जणांना आपला जीव गमवावा लागला होता तर अदांजे ७०० जण जखमी झाले होते.पोलिस जवानांनी हा हल्ला परतवून लावत नऊ दहशतवाद्यांना यमसदनी पाठवले होते तसेच अतिरेकी अजमल कसाब याला जिवंत पकडण्यात आले होते ह्या हल्ल्यात १८ पोलिस जवानांना वीरमरण आले म्हणून शहीद जवानांना मानवंदना देत आदरांजली वाहण्यात आली. तसेच माढा तालुक्यातील सुलतानपुर गावचे शहीद पोलिस राहुल शिंदे हे शिवमती आशाताई मोरजकर यांचा विद्यार्थी होते त्यांच्या आठवणीला उजाळा देत असताना आशाताईंना आश्रू अनावर झाले त्यामुळे प्रशाले मध्ये भावनिक वातावरण झाले होते.
याप्रसंगी ग्लोबल एज्युकेशनल इन्स्टिट्युट च्या मुख्याध्यापिकासह शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी,विद्यार्थी उपस्थित होते.