back to top
Monday, September 16, 2024
Google search engine
Homeधाराशिवएस. टी. कर्मचाऱ्यांचे आंदोलन, बस सेवेबाबत संभ्रम

एस. टी. कर्मचाऱ्यांचे आंदोलन, बस सेवेबाबत संभ्रम


धाराशिव – प्रलंबित मागण्यासाठी एस. टी. कर्मचारी पुन्हा एकदा संपावर जाणार आहेत. उद्या पासून धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे १४ संघटनाच्या एकत्रित कृती समितीच्या वतीने सांगण्यात आले आहे. धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले असले तरी कर्मचारी कामावर जाणार की नाही याबाबत ठोस भूमिका अद्याप जाहीर केली नाही. मात्र या आंदोलनाच्या माध्यमातून कामावर न जाण्याचा काही कर्मचाऱ्यांचा पवित्रा असल्याने त्याचा बसेसवर परिणाम होणार असल्याचे बोलले जात आहे.

या आहेत मागण्या

राज्य शासकीय कर्मचा-यांप्रमाणे रा.प. कामगारांना वेतन देण्यात यावे.

२) महागाई भत्याची माहे जुलै, २०१८ ते जानेवारी, २०२४ या कालावधीची थकबाकी अद्याप रा.प. कामगारांना मिळोलली नाही. सदरची सर्व थकबाकी कामगारांना त्वरीत मिळणे आवश्यक आहे.

३) शासकीय कर्मचा-यांप्रमाणे घरभाडे भत्ता व वार्षिक वेतनवाढीचा दर रा.प. कामगारांना लागू करण्याची कामगार करारात तरतुद असतानाही त्यामध्ये प्रशासनाने घरभाडे भत्याचा दर ८,१६,२४ टक्क्याऐवजी ७,१४,२१ टक्के व वार्षिक वेतनवाढीचा दर ३ टक्क्याऐवजी २ टक्के असा एकतर्फी कमी करून कामगार कराराच्या तरतुदीचा भंग केलेला आहे. याबाबत रा.प. प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केल्यानंतर प्रशासनाने घरभाडे भत्याचा दर शासकीय दरानुसार ८,१६,२४ टक्के माहे ऑक्टोबर २०२१ पासून व वार्षिक वेतनवाढीचा दर ३ टक्के माहे नोव्हेंबर २०२१ पासून रा.प. कामगारांना लागू केला. परंतु माहे एप्रिल २०१६ ते ऑक्टोबर २०२९ या कालावधीची वार्षिक वेतनवाढीची व घरभाडे भत्याची थकबाकी रा.प. कामगारांना अ‌द्याप मिळालेली नाही ती त्वरीत देण्यात यावी.

४) सन २०१६-२०२० या कालावधीसाठी वेतनवाढीपोटी रु.४८४९ कोटी जाहिर केले. सदर रु.४८४९ कोटीचे पुर्ण वाटपही झालेले नाही. तरी रु.४८४९ कोटी मधील शिल्लक रक्कमेचे कामगारांना वाटप करण्यात यावे.

५) एस.टी. कामगारांचे वेतन इतर महामंडळाच्या तुलनेत कमी आहे ही बाब विचारात घेऊन शासनाने कामगारांच्या सेवा कालावधीनुसार त्यांच्या मूळ वेतनात माहे नोव्हेंबर २०२१ पासून अनुक्रमे रु.५०००/-, रु.४०००/- व रु.२५००/- वाढ करण्यात आली. परंतु अशी वाढ देताना सेवा जेष्ठ कामगारांच्या मूळ वेतनात मोठ्या प्रमाणात विसंगती निर्माण झालेल्या आहेत. सदरच्या विसंगती दूर करण्यासाठी सर्वच कामगारांना सरसकट रु.५०००/- लागू करण्यात यावेत.

६) सध्या एस.टी. कामगारांना लागू असलेल्या वैद्यकिय खर्चाच्या प्रतिपुर्तीच्या योजने ऐवजी कॅशलेस योजना (इनडोर/आऊटडोर) एस.टी. कामगारांना लागू करण्यात यावी.

७) एस.टी. कामगारांना व त्यांच्या कुटूंबियांना सर्व प्रकारच्या एस. टी. बसेस मध्ये मोफत पासची सवलत फरक न भरता लागू करण्यात यावी. तसेच सेवानिवृत्त एस.टी. कामगारांना ६ महिन्या ऐवजी १ वर्षाचा मोफत पास सर्व प्रकारच्या एस.टी. बसेस मध्ये उपलब्ध करून देण्यात यावा. अश्या मागण्या एस. टी. कर्मचाऱ्यांनी यापूर्वीच निवेदनाद्वारे केल्या आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments