खाजगीकरण धोरणाच्या निषेधार्थ कर्मचाऱ्यांचे बेमुदत आंदोलन
उस्मानाबाद – महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी, अधिकारी, अभियंता संघर्ष समितीच्या वतीने तीन दिवस बेमुदत संपाचे हत्यार उपसले आहे.महावितरण कंपनीच्या भांडुप परिमंडल कार्यक्षेत्रामध्ये आदानी इलेक्ट्रिकल कंपनीस समांतर परवान्याचा निषेधार्थ हा संप पुकारला आहे. यावेळी महावितरण कर्मचाऱ्यांनी अदानी विरोधात घोषणाबाजी करून महावितरणचे खाजगीकरण धोरण बंद करावे महावितरण मध्ये आदानी कंपन्यांना समांतर वितरणाचा परवाना देऊ नका कंत्राटी आऊट सोर्सिंग व सुरक्षारक्षक कामगारांना कायम करा,तीनही कंपन्यातील रिक्त जागा भरा, इम्पॅनमेंट पध्दतीने कंत्राटीकरण बंद करा, महावितरण मधील 2019 नंतरचे उपकेंद्र कंपनी मार्फत चालवा व उपकेंद्रामध्ये कायम कर्मचाऱ्यांची पद स्थापना करा, या मागण्या सरकार कडे आंदोलनाच्या माध्यमातून केल्या आहेत.