परंडा (प्रतिनिधी)- श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ उस्मानाबाद या संस्थेचे सचिव डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद या विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य आणि राजकीय क्षेत्रामध्ये उत्तुंग भरारी घेणारे सन्माननीय संजय बाप्पा निंबाळकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कार्याची थोडक्यात ओळख देत आहे. शिक्षण पद्धतीवर लहान मूल ते नेता हे स्थितींतर घडवण्याची म्हणजेच तुम्ही माझ्यासाठी काय करू शकता ते मी तुमच्यासाठी काय करू शकतो हे स्थितींतर घडवण्याची प्रचंड मोठी जबाबदारी आहे तेव्हा ही जबाबदारी प्रत्येक प्राध्यापकांनी ओळखून आपल्या विद्यार्थ्यांना त्याच्या यशस्वीतेपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.शिक्षणाचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे आम्ही हे करू शकतो हा विश्वास मुलांच्या मनावर ठसवने महत्त्वाचे आहे हेच ते वारंवार आपल्या प्राध्यापकांना महाविद्यालयात येऊन सांगतात शिक्षण घेत असताना विद्यार्थ्यांना महाविद्यालयांमध्ये कोणतीही कमतरता भासू नये म्हणून वारंवार विद्यार्थ्यांचा विचार न करतात त्यांना काय हवे आहे त्यांना काय अपेक्षित आहे त्या सर्व शैक्षणिक सुविधा उपलब्ध केले जातील व आज या महाविद्यालयामध्ये शैक्षणिक सुविधा मुबलक प्रमाणामध्ये आहेत.
असे म्हणतात की शिक्षणाने माणूस जीवन कसे जगावे जीवनात यशस्वी कसे व्हावे त्यामुळे शिक्षण महत्त्वाचे आहे. शिक्षणामुळे माणूस प्रगतीच्या टोकावर जाऊन स्वतःची ओळख निर्माण करतो आणि स्वतःचा आदर्श समाजासमोर ठेवतो त्यामुळे समाजातील कित्येक लोक त्या गोष्टीचा अनुकरण करून आपल्या जीवनात यश संपादन करतात.याच पद्धतीने संजय निंबाळकर साहेब हे एक आदर्श व्यक्तिमत्व श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ उस्मानाबाद या संस्थेच्या माध्यमातून आम्हा मिळाले आहे. आमचे मार्गदर्शक,आम्हास प्रेरणा देणारे,महाविद्यालयाच्याच नव्हे तर संपूर्ण डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत असणाऱ्या सर्व महाविद्यालयास प्रेरणा व मार्गदर्शन करणारे आणि ज्यांना हवी तेथे मदत करणारे आमचे बप्पा हे आमच्यासाठी एक आदर्श व्यक्तिमत्व आहेत.संजय बप्पा निंबाळकर साहेबांनी परंडा या छोट्याशा गावामध्ये शिक्षणाच्या माध्यमातून शैक्षणिक परिवर्तन केले आहे.परंडा शहराची ओळख केवळ एक तालुका म्हणून होती परंतु रा गे शिंदे गुरुजी यांनी न्यू कॉलेज या महाविद्यालयाची स्थापना केली आणि त्याची जबाबदारी संजय बप्पा निंबाळकर साहेब यांच्याकडे दिली तेव्हापासून या महाविद्यालयाचा कायापालट त्यांनी केला आहे.त्यांनी या महाविद्यालयाची इमारत बांधून या इमारतीच्या आत मध्ये जे कर्मचारी म्हणून काम करतात त्यांच्यामध्ये विश्वास दिला की ही इमारत तुमची हे महाविद्यालय तुमचे आहे.त्यांनी एक आदर्श निर्माण करून दिला त्या आदर्शानेच महाविद्यालयातील सर्व कर्मचारी प्रामाणिकपणे काम करतात.संजय निंबाळकर साहेबांनी महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांना कधीच कर्मचारी म्हणून संबोधले नाही तर ते माझे कुटुंबातील सदस्य आहेत या भावनेने सर्व कर्मचाऱ्यांबरोबर एक घरातील मार्गदर्शक म्हणून ते भूमिका पार पाडत आहेत.आज या महाविद्यालयामध्ये कला, वाणिज्य,विज्ञान या शाखा व्यतिरिक्त विज्ञान शाखेमध्ये संगणक शास्त्र,पदुत्तर विभागामध्ये वनस्पतीशास्त्र, प्राणीशास्त्र, रसायनशास्त्र,कॉमर्स,पत्रकारिता, विधी महाविद्यालय अशा अनेक कोर्सेसची सुविधा या महाविद्यालयामध्ये केल्यामुळे आज तालुक्यातीलच नव्हे तर उस्मानाबाद जिल्ह्यातील अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी या महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेत आहेत.रा गे शिंदे गुरुजींचे स्वप्न होते की तालुक्यातील मुली शिकल्या पाहिजेत तेव्हा त्यांना शिक्षणासाठी गावातून परंडा सारख्या शहरांमध्ये येण्यासाठी बसेसची सोय नव्हती तेव्हा त्यांच्यासाठी एक स्वतंत्र वस्तीगृह असावे हे स्वप्न सुद्धा संजय निंबाळकर साहेबांनी पूर्ण केले. आज सुसज्जा अशी इमारत मुलींना राहण्यासाठी वस्तीग्रह च्या माध्यमातून तयार झाले आहे.अनेक ग्रामीण भागातील मुली या वस्तीग्रह मध्ये राहत होत्या व शिक्षण घेत होत्या परंतु कोरोनाच्या दरम्यान लॉक डाऊन झाल्यामुळे मुली आपापल्या घरी राहून ऑनलाइन शिक्षण घेत होत्या.परंतु परत आम्ही पुन्हा हे वस्तीग्रह सुरू करून मुलींना राहण्याची सोय करत आहोत असे त्यांनी आश्वासन दिले आहे. त्यामुळे अनेक मुलींचा शिक्षणाचा प्रश्न मार्गी लागला आहे.या महाविद्यालयातून शिक्षण घेतलेले कित्येक विद्यार्थी विविध पदावर कार्यरत आहेत हे केवळ त्यांनी केलेल्या उल्लेखनीय शैक्षणिक कार्याचे श्रेय आहे. महाविद्यालयामध्ये कोणत्याही कर्मचाऱ्यांची अडचण आल्यास मग महाविद्यालयातील अडचण असेल किंवा घरगुती अडचण असेल ती अगदी घरातील सदस्य प्रमाणे विचारून त्यांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होत त्यांना आधार देतात.त्यांच्या मार्गदर्शनामुळे महाविद्यालयांमध्ये आज वरिष्ठ विभागातील शंभर टक्के प्राध्यापक डॉक्टर झाले आहेत.अनेक विद्यार्थ्यांनी विविध प्रकल्प द्वारे या महाविद्यालयाची ओळख डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठा विद्यापीठामध्ये केली आहे. या महाविद्यालयातील अनेक प्राध्यापकांनी पेटंट तयार केले. शिक्षण क्षेत्राबरोबरच सामाजिक क्षेत्रात ही त्यांचा अनमोल असं योगदान लाभले आहे. त्यांनी अनेक सामाजिक बांधिलकी म्हणून समाजामध्ये गोरगरीब होतकरू विद्यार्थ्यांना सहकार्य केले आहे.सामाजिक मोठमोठे उपक्रम त्यांनी राबविले आहेत. त्यामुळे त्यांची मराठवाड्यामध्ये एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे.आज राजकारणातील अनेक मातब्बर नेते बपप्पांकडे एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणूनच पाहतात एक आदर्श मार्गदर्शक म्हणून पाहतात.शैक्षणिक क्षेत्र असो सामाजिक क्षेत्रा असो किंवा राजकीय क्षेत्र असो या तीनही क्षेत्रांमध्ये त्यांना एक मार्गदर्शकाच्या भूमिकेतून बप्पा मामा हीच उपाधी त्यांना मिळत आहे हीच त्यांची खरी ओळख आहे या जिल्ह्यातीलच नव्हे तर मराठवाड्यातील अनेक विविध क्षेत्रातील त्यांचे मित्रपरिवार त्यांचा त्यांचे मार्गदर्शन घेतात आणि त्यांनी सांगितलेल्या मार्गावर चालतात व आमच्या महाविद्यालयातील ही कर्मचारी याच पद्धतीने मार्गक्रमन करत आहेत.असे म्हणतात की सर्व पद्धतींचा पाया मग त्या सामाजिक असोत व राजकीय चांगुलपणावर आधारलेला असतो देशाच्या संसदेने आमका तमका कायदा केला म्हणून कोणताही देश महान व चांगला होत नाही तर त्या देशातील माणसे महान व चांगले असतील तरच त्या देशाला थोरवी प्राप्त होते आणि त्याच पद्धतीने संजय बप्पा निंबाळकर साहेबांनी आपल्या या कार्यकर्तुत्वाने या समाजामध्ये आपल्या व्यक्तिमत्त्वाचा ठसा उमटविला आहे.तेव्हा अशा या महान विचाराच्या आमच्या मार्गदर्शकास त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो त्यांना उत्तम आरोग्य लाभो त्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण होवो बप्पांना त्यांचा पूर्ण आयुष्य सुख समृद्धीचा आणि भरभराटीचे जावो अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो.
डॉ.शहाजी चंदनशिवे
सहाय्यक प्राध्यापक प्राणीशास्त्र विभाग रा.गे.शिदे महाविद्यालय परांडा.