राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत कार्यशाळा संपन्न

0
61

 


वाशी(शहाजी चेडे) – राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत वाशी शहरातील खाजगी वैद्यकीय व्यवसायिकांची कार्यशाळा दिनांक 20/01/2023 रोजी आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शक म्हणून डाॅ. रफिक अन्सारी (सहाय्यक संचालक आरोग्य सेवा कुष्ठरोग उस्मानाबाद) व तालुका वैद्यकीय आधिकारी डाॅ.गोवर्धन महेंद्रकर उपस्थित होते. तसेच वाशी तालुका डाॅक्टर्स असोसिएशन चे अध्यक्ष डाॅ.अक्षय इंगोले, सल्लागार डाॅ.सचिन पत्की आणि तालुक्यातील सर्व खासगी वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर डाॅ. कवडे दत्तात्रय, डाॅ. थोबडे सुरेंद्र, डाॅ.काझी एन.एफ, डाॅ. खोसे, डाॅ. पाटील, डाॅ. करडे.टी.एन, डाॅ. संजीव गरड, डाॅ. अमर तानवडे उपस्थित होते. 

यात कुष्ठरोग विरोधात ही अंतिम लढाई या शिर्षकाखाली बहुमूल्य असे मार्गदर्शन डाॅ. अन्सारी यांनी केले. तसेच आपल्या उस्मानाबाद जिल्ह्य़ातील कुष्ठरोग चा वाढता आलेख कसा रोखणार याविषयी चर्चा आणि उपाय सांगितले. गत वर्षी जवळपास 600 च्या वर नविन कुष्ठरोग चे रूग्ण संपूर्ण जिल्ह्य़ातून आढळून आले होते.  हीच संख्या आता शुन्या वर आणाण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे तसेच  हा आजार आता पूर्ण पणे भारतातून हद्दपार करण्याचा निर्धार करण्यात आला आहे.यात रूग्णांना पूर्ण पणे औषधोपचार मोफत असून तात्काळ मदत आणि मार्गदर्शन मिळेल असे आश्वासन ही दिलेले आहे. जर आपल्या आसपास असे रूग्ण आढळून येत असतील तर निसंकोच पणे आम्हास किंवा कुठल्याही जवळच्याच डाॅक्टर्सना कळवावे जेणेकरून रूग्णास त्वरीत उपचार करुन पुढील हानी टाळता येईल… “लवकर उपचार लवकर आराम.”हाच मुख्य उद्देश आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here