व्वा रे निवडीची पद्धत, नेत्यांच्या सुपुत्रांना आणि सामान्यांना वेगळा न्याय?

0
70

धाराशिव – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर घराणेशाहीचा आरोप का केला जातो याचा प्रत्यय जिल्ह्यातील एका सभेत नुकताच आला, निमित्त होते शरद युवा संवाद यात्रेचे. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख या संवाद यात्रेनिमित्त जिल्ह्यात आले होते. गेले अनेक महिने युवक काँग्रेसचे पद रिक्त आहे. अनेकांनी जिल्हाध्यक्ष होण्याची इच्छा देखील व्यक्त केली. त्यानंतर मेहबूब शेख यांनी भाषण संपताना काही इच्छुकांची नावे घेत त्यांच्यासोबत आलेल्या व्यक्तींना हात वरती करून कोणी किती माणसे आणली याची खातरजमा केली. मग यापूर्वी जे जिल्हाध्यक्ष किंवा पदाधिकारी  नेमले गेले त्यांची निवड करण्यापूर्वी अशीच पद्धत वापरली गेली होती का? की राष्ट्रवादीत फक्त सामान्य कार्यकर्त्यांना अग्निपरीक्षेला समोर जावे लागते. ज्यांची पोहोच, वशिला मोठा आहे त्यांना ताबडतोब पदे दिली जातात का हा प्रश्न यानिमित्ताने निर्माण होत आहेत. जिल्ह्यातील बडा नेता पक्ष सोडून गेल्यानंतर सुरू झालेली गळती अद्याप का थांबली नाही? प्रमुख पदावर आमचाच माणूस असायला हवा असा हट्ट कोण धरत आहे? गेल्या काही काळात पक्ष सोडून गेलेले पदाधिकारी कोणाच्या कार्यपद्धतीला सोडून गेले? यावर मंथन होणार की सामान्य कार्यकर्त्यांना वेट अँड वॉच वर ठेवले जाणार हा येणारा काळच सांगणार आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here