कोल्हापूर, दि.९ (अमोल कुरणे) नोकरीतील स्थायित्व प्रमाणपत्र देण्याच्या मोबदल्यात पाच हजार रुपये लाचेची मागणी करणाऱ्या सी.पी.आर. रुग्णालयातील वरिष्ठ लिपिकास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले. आरोपी हुसेनबाशा कादरसाब शेख,वय ४७, वरिष्ठ लिपिक,जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालय सी.पी.आर. हॉस्पिटल कोल्हापूर वर्ग-3, सध्या राहणार बुरुड गल्ली, नागराज मंदिर जवळ शनिवार पेठ, कोल्हापूर., मूळ गाव.अ १९५ कर्णिकनगर, जिजामाता बागेजवळ, सोलापूर शहरयातील तक्रारदार या छत्रपती प्रमिला राजे रुग्णालय (सी.पी.आर.) येथे अधिपरिचारिका पदावर नोकरीस आहेत. त्यांना स्थापित प्रमाणपत्र हुसेनदाशा शेख याने तयार करून दिले. त्या बदल्यात शेख याने ५ हजार रुपये लाचेची मागणी केली होती. ही रक्कम स्वीकारत असताना त्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक सरदार नाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक नितीन कुंभार ,पो.स.इ. संजीव बंबरगेकर, पो.हे.कॉ. विकास माने,पो.हे.कॉ. सुनिल घोसाळकर,पो.ना. सचिन पाटील,पो.काॅ. रुपेश माने,पो.काॅ.सूरज अपराध व अन्य सहकार्यांनी पकडले.