पाथरूड( प्रतिनिधी)भुम तालुक्यातील पाथरूड प्राथमिक आरोग्य केंद्राने रूग्णांना सेवा व चांगली सुविधा देण्याबाबतच्या झालेल्या. मानांकनात तालूक्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. स्वास्थ व परिवार कल्याण मंत्रालयाकडून राबविण्यात येत असलेल्या आरोग्य सेवा, रुग्णांच्या सर्वकष उपाचारा बाबतची जागरुकता, विविध योजना,सोयी, सुविधा शासकीय रुग्णालयाकडून योग्य प्रकारे राबविण्यात येतात का? याची शहानिशा करण्यासाठी शासनाच्या वतीने राष्ट्रीय गुणवत्ता हमी मानके (NQAS) या परीक्षण समीतीकडून देशभरात रुग्णालयांची तपासणी करण्यात येते. या राष्ट्रीय तपासणीसाठी धाराशिव जिल्ह्यातील
१० रुग्णालयाची जून २०२४ मध्ये पाहणी करण्यात आली होती. यामध्ये पाथ्रुड प्राथमिक आरोग्य केंद्राला 93.76 % गुण मिळाले असून तालुक्यात अव्वल येण्याचा मान मिळवला आहे. यासाठी मा.जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश हरीदास सर , मा.अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. विनयशील कुलकर्णी, सर माता व बालसंगोपन आरोग्य अधिकारी डॉ. कुलदीप मिटकरी सर , मा.वैद्यकीय अधिकारी जिल्हा प्रशिक्षण संघ धाराशिव डॉ. मेंढेकर, सर जिल्हा गुणवत्ता अश्वासन सन्मवयक डॉ. संतोष आहेर सर, मा. वैद्यकीय अधिकारी जिल्हा रूग्णालय धाराशिव डॉ. सुशील चव्हाण सर, व भुम तालूका आरोग्य अधिकारी डॉ. अमोल शिनगारे सर यांचे मार्गदर्शन लाभले. पाथरूड प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकिय अधिकारी डॉ. एस.बी. गायकवाड मॅडम, डॉ. एम जी.पोतरे सर, तालुकास्तरीय अधिकारी व कर्मचारी यांच्यासह पाथरूड प्राथमिक आरोग्य केंद्रातील सर्व अधिकारी व कर्मचारी, गट प्रवर्तक, आशा स्वंयसेविका यांनी परिश्रम घेतले. या सर्व टीमचे जिल्हाभरातून कौतुक होत आहे.
- तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये जिजाऊ गुरुकुल चा दबदबा
- आरोग्यमंत्री प्रा.डॉ.तानाजीराव सावंत यांच्या संकल्पनेतून महिलांसाठी खेळ पैठणीचा कार्यक्रम उत्सहात संपन्न
- भैरवनाथ उद्योग समुहाच्या वतीने वाकडी येथे शेत रस्ता कामास प्रारंभ
- परंडा येथे खेळ पैठणीचा सन्मान नारी शक्तीचा कार्यक्रमाचे आयोजन
- एस. टी. कर्मचाऱ्यांचे आंदोलन, बस सेवेबाबत संभ्रम