लोहारा येथील तहसीलदार निवासस्थान नवीन बांधकामाला भेगा! 

0
89

नविन इमारत धोकादायक गुतेदारांवर कारवाई करा!!

लोहारा प्रतिनिधी ( यशवंत भुसारे) 

      लोहारा हे तालुक्याचे ठिकाण असून येथील तहसीलदार यांचे नवीन निवासस्थान बांधकामाला कमी कालावधीत अनेक ठिकाणी तडे जाऊन काही ठिकाणी भिंतीला भेगा गेल्याचे बोलके छायाचित्र दैनिक जनमतने रेखाटले आहे. 

     सविस्तर माहिती अशी की,शासनाने तालुक्याच्या ठिकाणी तहसीलदार यांना मुख्यालयी राहण्यासाठी लाखो रुपये खर्च करून सार्वजनिक बांधकाम विभाग धाराशिव अंतर्गत लोहारा येथे ५ फेब्रुवारी २०२० रोजी तहसीलदार निवासस्थानाचे बांधकाम सुरू केले ७ डिसेंबर २०२१ ला ते काम पूर्ण झाले खरे पण हे निवासस्थान तहसीलदारने ताब्यात घेण्यापूर्वीच स्लॅप चा काही दर्शनी भाग अपोआप गळुन पडत असल्याचे दिसून येताच संबंधित गुतेदारांनी जागोजागी नुसती डागडुजी केली पण भिंतीला अनेक ठिकाणी भेगा पडुन काही ठिकाणी भिंत खचल्याचे दिसून येत आहे.त्यामुळे नवीन तहसीलदार निवासस्थान बांधकाम हे निकृष्ट दर्जाचे झाले असून धोकादायक इमारत बनली आहे. शासनाचे लाखो रुपयचा निधी पाण्यात गेल्याची चर्चा मात्र ऐकण्यास मिळत आहे.अवघ्या दीड ते दोन वर्षात बांधकामाला तडे गेले असून सार्वजनिक बाधकाम विभागाचे संबंधित अधिकारी व गुतेदारांच्या संगनमताने अर्थपुर्ण व्यवहार करुन लोहारा तहसीलदार निवासस्थान बांधकाम निकृष्ट दर्जाचे झाल्याचे बोलले जात आहे.

        तेव्हा जिल्हाधिकाऱ्यांनी तात्काळ या कामाची चौकशी करून संबंधित अधिकारी व गुतेदारांवर योग्यती कारवाई करावी अशी मागणी तालुक्यातून केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here