दिंडी सोहळ्यातील संत, वारकऱ्यांच्या वेशभूषतील विद्यार्थ्यानी ग्रामस्थांचे वेधले लक्ष
परंडा [ दि.१३ जुलै ] महाराष्ट्राच्या संस्कृती परंपरेने चालत आलेला पालखी,दिंडी सोहळ्याची माहीती आत्ताच्या पिढीला व्हावी तसेच जाती,धर्म मतभेद,सहकार्य,ऐकतेची भावना मुलांमध्ये रुजावी व तीची जोपासना करण्यासाठी सोनारी जिल्हा परिषद शाळेच्या वतीने आषाढी पालखी सोहळ्याचे आयोजन दि.१३जुलै रोजी करण्यात आले होते.
जि.प.शाळेतील सर्व मुला-मुलींनी यावेळी संत वारकऱ्यांचे पोशाख परिधान केले होते.सकाळी गावातील मुख्य रस्त्यावर पालखी सोहळा पार पड़ताच पंढरपुरच्या वारीप्रमाणेच रिंगणाचे आयोजन करण्यात आले होते,गावात विविध ठिकाणी रिंगण सोहळा पार पडला.
या वेळी मुलच्या हातात भगवे ध्वज तर मुलीच्या डोक्यावर तूलशी वृंदावन हे दृष्य पाहून पंढरपुरच्या आषाढी वारीला दिडीं सोहळा निघाला आसल्याचा भास होत होता.
एरव्ही शाळेच्या गणवेशात असणारी लहान मुलं-मुली संत, वारकऱ्यांचा पांढरा झब्बा, डोक्यावर टोपी,कपाळी बुक्का, गळ्यात टाळ आणि नऊवारी साडीत,केसात गजरा,डोक्यावर तुलस आणि मुखी विठ्ठल नामाची भरली शाळा,शाळा शिकताना तहान भूक हरली’या अभंगा प्रमाणे विठ्ठल रखुमाईच्या भक्तीत दंग झालेले बाल वारकरी गावातील प्रमुख मार्गावरुन दाखल होत संपूर्ण गावात ही पायी दिंडी अवतरली.
यावेळी ज्ञानाच्या मंदिरात भोळ्या विठ्ठलाच्या हरिनामाचा गजर झाला.अन अवघे विद्यार्थी, शिक्षक व ग्रामस्थ दिंडी सोहळ्याच्या भक्तीसागरात तल्लीन झाल्याचे पाहायला मिळाले.यावेळी शाळेतील शिक्षक देखील संत,वारकऱ्यांच्या वेशभूषत दिडी सोहळ्यात सहभागी होते.
जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या वतीने आयोजित दिंडीमध्ये पहिली ते दहावी च्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.हि दिंडी यशस्वी पार पाडण्यासाठी प्राथमीक शाळेचे मुख्याध्यापक पोपट परदेशी, माध्यामिक शाळेचे मुख्याध्यापक विलास थोरात यांच्या सह सर्व शिक्षकांनी परीश्रम घेतले.
वारकऱ्यांच्या वेशभूषेतील लहान मुले -मुली,शिक्षक पालखी मिरवणूक,विठू नामाचा गजर अशा भक्तीमय वातावरणात सोनारी गावातील परिसरासह शाळेत दिंडी सोहळा रंगला. विठ्ठल-रखुमाई व अन्य संतांच्या वेशभूषा केलेले विद्यार्थी पालक, ग्रामस्थांचे आकर्षण ठरले.बाल वारकरी दिंडी सोहळ्याचे नागरिकांनी ठिकठिकाणी स्वागत केले.
बल वारकऱ्यांची पायी दिंडी संपुर्ण गावातून येऊन शाळेत विसावली.यावेळी शालेय व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष गणेश फले यांच्या वतीने बाल वारकऱ्यांना खाऊ चे वाटप करण्यात आले.यावेळी सरपंच दिपक दुबळे,दिगंबर ईटकर, अविनाश हांगे,राम ईटकर, आण्णा हांगे,नाना मांडवे व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.