पारा (प्रतिनिधी ): सतत च्या नापिकीला तसेच कर्जबाजारी पणाला कंटाळून वाशी तालुक्यातील सारोळा (मां)येथील एका अल्प भूधारक शेतकरी पुत्राने आत्महत्या केल्याची घटना शनिवारी दि.22 जून रोजी सकाळी उघडकीस आली.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, मेघराज शेषेराव मोरे वय 35वर्ष या शेतकरी पुत्राने कष्ट करून शेतात दरवर्षी पीक घेतले होतें. परंतू सतत च्या नापिकीला तसेच विधवा आईच्या नावावर काढलेले बँकेचे पीक कर्ज कसे फेडायचे? या विवंचनेतून मेघराज मोरे यांनी घराशेजारील शेतामध्ये झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची फिर्याद मयताच्या भावाने पोलीसात दिल्यामुळे वाशी पोलिसात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली असून, शवविच्चदन प्राथमिक आरोग्य केंद्र पारा येथे करण्यात आले असून पुढील तपास प्रभारी पोलीस निरीक्षक रविंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली जमादार मोहसीन खान पठाण, कॉ. नवनाथ सुरवसे , कॉ. किरण माळी करत आहेत.
या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली होती.