back to top
Sunday, January 26, 2025
Google search engine
Homeताज्या बातम्यासलगरा आणि किलज पंचक्रोशीतून ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांना जास्त मताधिक्य

सलगरा आणि किलज पंचक्रोशीतून ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांना जास्त मताधिक्य

सलगरा,दि.५(प्रतिक भोसले) – आजवर झालेल्या एकूण १७ लोकसभा निवडणुकांच्या इतिहासात सर्वाधिक मताधिक्याने विजयी होण्याचा विक्रम ओमराजे निंबाळकर यांच्या नावावर नोंदवला गेला आहे. पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेले माजी मंत्री डॉ.पद्मसिंह पाटील यांची सुन व भाजपा आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या पत्नी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार अर्चना पाटील यांचा ओमराजे यांनी तब्बल ३ लाख २९ हजार ८४६ मतांनी पराभव केला आहे. ओमराजे निंबाळकर यांना सात लाख ४८ हजार ७५२ तर अर्चना पाटील यांना ४ लाख १८ हजार ९०६ इतकी मते मिळाली आहेत. पहिल्या फेरीपासून ओमराजे निंबाळकर यांनी आघाडी घेतली होती. ते अखेरच्या फेरीपर्यंत ही आघाडी कायम राहिली. एकाही फेरीत महायुतीच्या अर्चना पाटील यांना आघाडी घेता आली नाही. लोकसभा मतदारसंघातील सर्व सहा विधानसभा मतदारसंघातून ओमराजे निंबाळकर यांनी लक्षवेधी मताधिक्य खेचून घेतले आहे.

दरम्यान धाराशिव लोकसभा निवडणुकीत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे ओमराजे निंबाळकर यांच्या प्रचार सभेला विरोधकांकडून काही ठिकाणी नाराजगीचे सुर उमटलेले होते, खासदारांचा फोनवरुन जनतेशी असलेला संपर्क हा चांगलाच टीकेचा विषय बनला, बसमध्ये जागा मिळवून देणं, जॅक देणं हे खासदाराचं काम आहे का? असा सवालही महायुतीच्या काही नेत्यांनी प्रचारात विचारला होता. अन् त्यातच विशेष म्हणजे राणाजगजितसिंह पाटील हे तुळजापुरचे आमदार असताना सुध्दा आमदार पाटील यांच्या पत्नी म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार अर्चना पाटील यांना कौल न देता – सलगरा, गंधोरा, किलज, वाणेगाव, वडगाव, बोरनदीवाडी, जवळगा, देवसिंगा, कार्ला, या गावकऱ्यांनी ओमराजे यांना कौल दिला आहे.

१) किलज मध्ये ओमराजे निंबाळकर यांना १२९१ आणि अर्चना पाटील यांना ३६३ मतं पडली असून या मध्ये ओमराजे निंबाळकर यांना ९२८ अधिक मतं मिळाली आहेत.

२) सलगरा दिवटी मध्ये ओमराजे निंबाळकर यांना १२५९ आणि अर्चना पाटील यांना ६५५ मतं पडली असून या मध्ये ओमराजे निंबाळकर यांना ६०४ अधिक मतं मिळाली आहेत.

२) काक्रंबा मध्ये ओमराजे निंबाळकर यांना १४४० आणि अर्चना पाटील यांना ९५९ मतं पडली असून या मध्ये ओमराजे निंबाळकर यांना ४८१ अधिक मतं मिळाली आहेत.

३) जवळगा मेसाई मध्ये ओमराजे निंबाळकर यांना ६१४ आणि अर्चना पाटील यांना २३४ मतं पडली असून या मध्ये ओमराजे निंबाळकर यांना ३८० अधिक मतं मिळाली आहेत.

४) वाणेगाव मध्ये ओमराजे निंबाळकर यांना ४६० आणि अर्चना पाटील यांना १५९ मतं पडली असून या मध्ये ओमराजे निंबाळकर यांना ३०१ अधिक मतं मिळाली आहेत.

५) देवसिंगा मध्ये ओमराजे निंबाळकर यांना ४७९ आणि अर्चना पाटील यांना २६९ मतं पडली असून या मध्ये ओमराजे निंबाळकर यांना २१० अधिक मतं मिळाली आहेत.

६) वडगाव मध्ये ओमराजे निंबाळकर यांना ३३७ आणि अर्चना पाटील यांना १८७ मतं पडली असून या मध्ये ओमराजे निंबाळकर यांना १५० अधिक मतं मिळाली आहेत.

७) बोरनदीवाडी मध्ये ओमराजे निंबाळकर यांना २०८ आणि अर्चना पाटील यांना १२५ मतं पडली असून या मध्ये ओमराजे निंबाळकर यांना ८३ अधिक मतं मिळाली आहेत.

८) गंधोरा मध्ये ओमराजे निंबाळकर यांना ७०४ आणि अर्चना पाटील यांना ६२५ मतं पडली असून या मध्ये ओमराजे निंबाळकर यांना ७९ मतं अधिक मिळाली आहेत.

९) कार्ला मध्ये ओमराजे निंबाळकर यांना ५०५ आणि अर्चना पाटील यांना ४४८ मतं पडली असून या मध्ये ओमराजे निंबाळकर यांना ५७ अधिक मतं मिळाली आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments