धाराशिव : आगामी लोकसभा निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहचला आहे. यातच धाराशिव लोकसभा मतदारसंघात महायुतीकडून अर्चना पाटील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. तर दुसऱ्या बाजूला विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांना संधी देण्यात आलीय. यातच आता दोन्ही उमेदवारांनी प्रचाराला सुरूवात केली असून जोरदार टिका टिप्पणी सुरू झाली आहे. यातच ओमराजे निंबाळकर यांनी अर्चना पाटील यांच्यावर टिका केली. त्यावर आता बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी निंबाळकरांचा चांगलाच समाचार घेतला आहे.
धाराशिव लोकसभा मतदारसंघात जवळपास २२ ते २५ उमेदवार निवडणुक लढविण्यासाठी इच्छूक होते. मात्र या मतदारसंघातील सगळेच लोकप्रतिनिधींनी अर्चनाताई पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब केला. राजकारणात ज्यावेळी शरद पवारांनी मोठी राजकीय भूमिका घेतली. त्यावेळी त्यांची पाठराखण करण्याचं काम पद्मसिंह पाटील यांनी केलं आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात प्रमुख भूमिका घेण्याचंही काम पाटील यांनी केलं आहे.
त्यामुळे ज्यांच्याकडून काम होतंय, त्यांच्या नावाची शिफारस पुढे आली. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतत्वाखाली आणि एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या महायुतीने आमच्या मतदारसंघात खुप निधी आला. तो आम्ही आतापर्यंत स्वप्ननातही पाहिला नाही. यातच आता समोरून जे काही बोलबच्चून सुरू आहे. त्यांना माझं चॅलेंज आहे की तुम्ही आतापर्यंत मतदारसंघात किती निधी आणला ? ते जाहीर करा. असेही आवाहन त्यांनी केलंय.
आपल्या मतदारसंघात नवीन रोजगार निर्माण करणं, रोजगार आणणं, योजना आणणं हे काम खासदाराचं आहे. एसटीत जागा देणं हे त्यांचं काम आहे का ? असा सवालही राजेंद्र राऊत यांनी निंबाळकरांना विचारलं. बार्शी तालुक्यात आतापर्यंत २ कोटीपेक्षा निधी आणला असल्याचाही त्यांनी दावा केला. मोदींच्या नावावर मत मागितली. मोदींमुळेच निवडून आलो म्हणायचं,अन् पुन्हा त्यांनीच माझ्याविरोधात उभं राहा म्हणायचं. ही कृतघ्न झाली. अर्चनापाटील यांनी असा टोलाही त्यांनी लगावला.