धाराशिव –
मुरुमाची रॉयल्टी न भरुन घेता वाहतूक करण्याची परवानगी देण्यासाठी,तलाठी यांना कारवाई न करण्यासाठी ४ हजाराची लाच स्वीकारताना मंडळ देवानंद मरगु कांबळे वय 51 वर्षे , मंडळ अधिकारी (वर्ग-३), येरमाळा सर्कल, ता.कळंब, जि.धाराशीव. यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे.
मौजे चोराखळी येथील देवस्थान जमिन गट क्रमांक 639/1 मधील 50 ब्रास मुरूम रॉयल्टी न भरुन घेता वाहतूक करण्याची परवानगी देण्यासाठी तसेच संबंधित तलाठी यांना कारवाई न करणे बाबत सांगणे करिता तक्रारदार यांच्याकडे पंचांसमक्ष 4000/-रुपये लाचेची मागणी करून 4000/- रुपये लाच रक्कम स्वतः स्वीकारली असता त्यांना ताब्यात घेण्यात आले असुन पोलीस स्टेशन आनंदनगर, ज़िल्हा धाराशिव येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु आहे.
सापळा अधिकारी विकास राठोड, पोलिस निरीक्षक यांनी काम पाहिले तर
सापळा पथकात – पोलीस अमलदार मधुकर जाधव , विशाल डोके यांचा समावेश आहे.