धाराशिव दि.१ (प्रतिनिधी) – तालुक्यातील जागजी येथील एन.व्ही.पी. शुगर प्रा. लि. या कारखान्यास गळपासाठी ऊस दिलेल्या शेतकऱ्यांचे बील दर १६ व्या दिवशी त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येते. तर ऊस तोडणी ठेकेदार व मजुर, कर्मचारी यांचे पेमेंट देखील नियमितपणे त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याचे काम कारखाना सुरू केल्यापासून पहिल्या १६ व्या दिवसांपासून चालू केले आहे. ते बिल व पेमेंट देण्याचे सातत्य कायम ठेवून शेतकऱ्यांना भरोसा व विश्वास देण्याचे महत्त्वाचे काम करण्याबरोबरच इतर कारखान्यांसमोर आदर्श निर्माण केला असल्याचे प्रतिपादन खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी दि.१ मार्च रोजी केले.
धाराशिव तालुक्यातील जागजी शिवारामध्ये असलेल्या एनव्हीपी शुगर प्रा. लि., या कारखान्याने आजपर्यंत १ लाख १ टन उसाचे गाळप केले आहे. तर त्यापासून ३० किलो वजनाच्या ४ लाख ९१ हजार गुळ पावडर पोत्यांचे पूजन खा राजेनिंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आप्पासाहेब पाटील, कारखान्याचे अध्यक्ष नानासाहेब उर्फ बालाजी पाटील, सी.ए. सचिन शिंदे, तेली समाज संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवि कोरे आळणीकर, राजाभाऊ देशमुख, अक्षय पाटील, प्रशासकीय अधिकारी सुनिल लोमटे, चिफ इंजिनिअर अविनाश समुद्रे, मुख्य शेतकी अधिकारी जयवंत रोहिले, मे.चिफ केमिस्ट बिक्कड, पॅन इन्चार्ज राजेंद्र शिंदे, नरसिंह मोरे, समाधान शिंदे आदी उपस्थित होते. पुढे बोलताना खा. राजेनिंबाळकर म्हणाले की, एनव्हीपी शुगर कारखान्याच्या माध्यमातून आजपर्यंत १ लाख १ टन शेतकऱ्यांच्या उसाचे यशस्वी गाळप करण्याचे काम झाले आहे. त्याच्यामध्ये आनंदाची दुसरी गोष्ट अशी की ज्या शेतकऱ्यांनी ऊस गळपास घातला. त्या शेतकऱ्यांच्या उसाचे बिल पवनराजे लोकसमृद्धी मल्टीस्टेट को-ऑप क्रेडिट सोसायटी लि., धाराशिव या बँकेतील शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जात आहे. विशेष म्हणजे काल दि.२९ फेब्रुवारीपर्यंत जो
ऊस गाळप करण्यात आला. त्या उसाचे बिलाची रक्कम देखील संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यावर दुसऱ्या दिवशीच जमा झाली असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. तसेच पेमेंट देण्याचा देखील या कारखान्याने क्रम ठरविला असून प्रथम क्रम ऊस उत्पादक शेतकरी तर दुसरा क्रम ऊस तोडणी करणारे ठेकेदार व ऊस तोड मजूर तसेच तिसरा क्रम सर्व कामगारांचा ठेवला असून चौथा क्रम कारखानदाराचा असल्याचा त्यांनी सांगितले. यावेळी खा राजेनिंबाळकर यांनी कारखान्यातील वेगवेगळ्या प्लांटची प्रत्यक्ष पत्रकारांसमवेत पाहणी केली. यावेळी कारखान्याचे सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, कामगार यांच्यासह जागजी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
……………………………
२८ ऑक्टोबर २०२३ पासून कारखान्याचे गाळप सुरू केले असून आजपर्यंत १ लाख २ टन उसाचे गाळप या कारखान्याच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी या कारखान्यास गाळपासाठी दिलेल्या उसाचे बिल १६ व्या दिवशी संबंधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्याचे काम सातत्याने केले जात आहे. पहिल्यापासून शेतकऱ्यांना प्राधान्य दिले असून उसास २ हजार ८०० रुपये दर दिला असून शेतकऱ्यांनी देखील या कारखान्यास ऊस देऊन चांगले सहकार्य केले असल्याचे कारखान्याचे चेअरमन नानासाहेब उर्फ बालाजी पाटील यांनी सांगितले. तसेच २५ मार्चपर्यंत कारखाना पूर्ण क्षमतेने चालणार आहे. विशेष ज्या कालपर्यंत गळपासाठी ऊस दिलेला आहे, त्या सर्व शेतकऱ्यांचे बिल पवनराजे लोकसमृद्धी मल्टीस्टेट को- ऑफ सोसायटी लि., या बँकेमध्ये जमा करण्यात आले असून त्या बँकेत जाऊन शेतकऱ्यांनी ती रक्कम उचलावी. तसेच शेतकऱ्यांनी देखील आपला ऊस या कारखान्यास गाळपासाठी देऊन सहकार्य करावे, असे आवाहन देखील पाटील यांनी केले