परंडा प्रतिनिधी -भोंजा येथील श्रीराम सार्वजनिक वाचनालय यांच्या वतीने शिवजयंतीचे औचित्य साधून भोंजा जि.प.शाळेतील विद्यार्थ्याना वाचनालयाचे चालक कृष्णा मांजरे सर यांच्या हस्ते शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
शिवजयंती निमित्त भोजा जि.प.शाळेतील विद्यार्थ्याच्या विविध स्पर्धा ठेवण्यात आल्या होत्या यात वकृत्व स्पर्धा,पाढे पाठांतर स्पर्धा,रांगोळी स्पर्धा, इंग्रजी शब्द पाठांतर स्पर्धा, शिवजयंती सजावट स्पर्धा या स्पर्धेत विजेत्यां विद्यार्थ्याना कृष्णा मांजरे सर यांच्या वतीने पॅड,कंपास,पेन्सिल,रजिस्टर आदी साहित्याचे वाटप करण्यात आले.पारितोशीक स्विकारल्या नंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहण्यासारखा होता. मार्गदर्शन पुस्तकाचे उपस्थित पालकांना वाटप करण्यात आले.
यावेळी भोंजा ग्रामपंचायतीच्या सरपंच राणी समाधान कोळी,उपाध्यक्ष नवनाथ नेटके,बिरमल कोंडलकर,खंडू मोरे,हनुमंत जगताप,महादेव काशीद,बाळासाहेब नेटके, पल्लवी सावंत,रणजित नेटके, राजू सुतार आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बाळासाहेब घोगरे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन अधीकराव शेळवणे सर यांनी कले.कार्यक्रम यशस्वितेसाठी शिक्षिका ज्योती माळी,राऊत मॅडम,सोमनाथ पवार परिश्रम घेतले.
Home ताज्या बातम्या श्रीराम सार्वजनिक वाचनालय भोंजा यांच्या वतीने जि.प. शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप