धाराशिव – दीड लाखाची लाच घेताना सहायक नगर रचनाकार मयुरेश माणिकराव केंद्रे, वय 30 वर्षे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकला आहे. याबाबत माहिती अशी की, तक्रारदार यांचे मौजे शिंदफळ, ता. तुळजापूर येथील शेत जमीन गट नंबर 187 मधील 120 गुंठे अकृषी यासाठीचे प्रस्तावास तात्पुरती मंजुरी (lay out tentative) देण्यासाठी यातील आलोसे यांनी 6,00,000 /- रुपयाची मागणी करून तडजोडीअंती 5,00,000/- रुपये स्वीकारण्याचे मान्य केले व सदर 5,00,000/- रुपये रकमेपैकी 1,50,000/- रुपये लागलीच स्वीकारण्याचे व उर्वरित 3,50,000/- रुपये नंतरने स्वीकारण्याचे मान्य करून 1,50,000/- रुपये लाच रक्कम पंचासमक्ष आलोसे यांनी स्वतः स्वीकारले असता त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. सापळा पथकात सिद्धाराम म्हेत्रे पोलीस उपाधीक्षक, विकास राठोड पोलीस निरीक्षक,पोलीस अमलदार इफ्तेकार शेख ,विष्णू बेळे, विशाल डोके, ,सचिन शेवाळे, अविनाश आचार्य,चालक दत्तात्रय करडे यांनी काम पाहिले
आणखी वाचा कांदा अनुदान (३५०₹) मिळण्यासाठी या आहेत अटी शर्ती
पॅनकार्ड आधारकार्डला जोडण्यासाठी 30 जूनपर्यंत मुदतवाढ