अंगणवाडीचा तांत्रिक मंजुरी आदेश देण्यासाठी लाच स्वीकारणारा जिल्हा परिषदेचा अभियंता जेरबंद

0
56

 


धाराशिव – अंगणवाडीचा तांत्रिक मंजुरी आदेश देण्यासाठी ७५०० रुपये लाचेची मागणी करून ६००० रुपये लाच  स्वीकारणाऱ्या जिल्हा परिषद अभियंतास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले असून या कारवाईनंतर मिनिमंत्रालयासह जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

तक्रारदार हे मौजे शेकापूर ग्रामपंचायतचे सदस्य असून त्यांच्या  पत्नी या सरपंच आहेत. मौजे शेकापूर येथे तीन मिनी अंगणवाड्या मंजूर झालेल्या असून त्यासाठी लागणारी आवश्यक ती कागदपत्र ग्रामपंचायत मार्फत जिल्हा परिषद उस्मानाबाद येथे तक्रारदार यांनी दाखल केली होती. सदर कामाचा तांत्रिक मंजुरी आदेश देण्यासाठी कासिम उस्मान सय्यद, वय 55 वर्ष,  शाखा अभियंता, जिल्हा परिषद, बांधकाम विभाग,  यांनी  तक्रारदार यांच्याकडे आज  दिनांक 10.04.2023 रोजी 7,500/- रुपये लाचेची मागणी करून तडजोडअंती 6,000/- रुपये लाच रक्कम लागलीच स्वीकारण्याचे मान्य करून  दिनांक 10.04.2023  रोजी 6,000/- रुपये लाच रक्कम पंचासमक्ष स्विकारल्याने आलोसे  यांना ताब्यात घेण्यात आले असुन पोलीस स्टेशन आनंदनगर, ज़िल्हा-धाराशिव  येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here