परंडा कृषी उत्पन्न बाजार समीतीच्या निवडणुकीत महायुतीला पराभवाचा धक्का तर महाविकास अघाडीची एक हाती सत्ता

0
87

 

महाविकास आघाडीचे १३ तर महायुतीचे ५ उमेदवार विजयी

महायुतीच्या कार्यकर्त्यानी गुलालाची उधळण व फटाक्याची अतीषबाजी करत केला जल्लोष साजरा

परंडा (भजनदास गुडे दि २९ एप्रिल ) परंडा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीत माजी आमदार राहुल मोटे व माजी आमदार ज्ञानेश्वर पाटील यांच्या नेतृत्वा खालील महाविकास आघाडीने १८ पैकी १३ जागा जिंकुन दणदणीत विजय संपादन करत कृषी उत्पन्न बाजार समीतीची सत्ता कबीज केली आहे.निकाल घोषीत होताच महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गुलाला ची उधळण व फटाक्याची अतिष बाजी करत जल्लोष साजरा केला.

    आरोग्य मंत्री तथा पालकमंत्री डॉ.तानाजी सावंत व भाजपाचे माजी आमदार सुजितसिंह ठाकुर यांच्या नेतृत्वाखालील महायूतीच्या पॅनलचा दारून पराभव झाला आहे.आजी माजी आमदारांनी प्रतिष्ठेची कलेल्या या निवडणूकीत महाविकास आघाडीचा दणदणीत विजय होताच कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.निकाल पाहण्या साठी कार्यकर्त्यांनी सकाळपासुनच तहसिल कार्यालयासमोर मोठी गर्दी केली होती.

     प्रथम ग्रामपंचायतीच्या चार उमेदवारांचा निकाल घोषीत करण्यात आला यात ग्राम पंचायत मतदार संघातील महायुतीचे चारीही उमेदवार विजयी घोषीत करण्यात आले.या वेळी महायुतीतीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोश केला मात्र कालांतराने सोसायटी मतदार संघातील उमेदवारांचा निकाल घोषीत करण्यात आला. यात महाविकास आघाडी चे सर्वच उमेदवार विजय झाल्याने राष्ट्रवादीचे माजी आमदार राहुल मोटे यांनी परंडा येथे कार्यकर्त्यांची भेट घेतली व पुढील निवडणूका महाविकास आघाडी करून लढविल्या जातील असल्याचे सांगितले.

           महाविकास आघाडीने सोसायटी मतदार संघातील ११ जागा तर व्यापारी मतदार संघातील २ जागा आशा एकुन १८ पैकी १३ जागेवर विजय मिळवत कृषी उत्पन्न बाजार समीतीची एक हाती सत्ता काबीज केली आहे.

    तर महायूतीला ग्रामपंचायत मतदार संघातील ४ व हमाल मापाडी मतदार संघातील १ जागा असे एकुन १८ पैकी ५ जागेवर विजय मिळाला मात्र अतीआत्म विश्वासामुळे बाजार समीतीची सत्ता गमवावी लगाली.

       सोसायटी मतदार संघातून महाविकास अघाडीचे विजयी उमेदवार व त्यांना मिळालेली मते नलवडे हरी (३७४) जैन जयकुमार ( ३७३), पवार संजय  (३६८ ),सिरसट सोमनाथ (३५७) घोगरे दादा (३४१) जगताप रविंद्र  (३२६) जाधव शंकर (३२४) मते घेऊन विजयी झाले आहेत.तर माहिला राखीव मतदार संघातील उमेदवार देशमुख रतनबाई (३७३) तर मिस्कीन सवीता (३६०) मते घेऊन विजयी झाल्या आहेत.तर ओबीसी मतदार संघातील उमेदवार शिंदे सुरेश यांना (३९०)तर विमुक्त जाती भटक्या जमाती मतदार संघातील उमेदवार ॲड.देवकते सुजित हे  (३९६) मते घेऊन विजयी झाले आहेत.तर महाविकास आघाडीचे व्यापारी मतदार संघातील उमेदवार काशीद अनिकेत यांना ४८मते तर बागवान जावेद हे ४१ मते घेऊन विजयी झाले आहेत.

     तर ग्रामपंचायत मतदार संघातून महायूतीचे उमेदवार डोके राहुल (२९३) रगडे अरविंद   (२८३)मते घेऊन विजयी झाले आहेत तर अनुसुचित जाती जमाती राखीव जागेतून आरपीआयचे बनसोडे 

विजयकुमार (३१३) तर आर्थीक दुर्बल घटक राखीव जागेवर  बारसकर महादेव यांनी २८१ मते घेऊन विजय मिळवीला आहे.

तर महायूती चे हमाल मापाडी मतदार संघातील उमेदवार मिठाळे परमेश्वर यांनी ४५ पैकी २६ मते घेऊन विजय मिळाला आहे.तर ग्रामपंचायत मतदार संघातील अपक्ष उमेदवार भागडे विशाल यांना ६ मते मिळाली तर व्यापारी मतदार संघातील अपक्ष उमेदवार काझी मेहफुज अली यांना ४ मते मिळाली आहेत

     महाविकास अघाडीच्या विजयी उमेदवारांची घोषणा होताच राष्ट्रवादी कॉग्रेस,शिवसेना कॉग्रेस आय,वंचीत बहूजन आघाड़ीच्या कार्यकर्त्यांनी गुलाला ची उधळन व फटाक्याची अतीष बाजी करत जल्लोष साजरा केला.

        यावेळी शिवसेनेचे तालूका प्रमुख मेघराज पाटील,रणजित पाटील,राहुल बनसोडे,ईस्माईल कुरेशी,ॲड हरिश्चंद्र सुर्यवंशी मैनूदीन तुटके,दिपक गायकवाड, हनुमंत गायकवाड,रमेश परदेशी, आबास मुजावर,संजय कदम, प्रशांत गायकवाड,नसीर शहाबर्फीवाले,शंकर ईतापे,उमेश परदेशी,हनुमंत ढोरे,भाऊसाहेब गायकवाड,प्रकाश पाटील,अंकुश डांगे,विनोद साळवे, नागनाथ नरूटे पाटील,पांडूरंग कोकाटे, अंगद कुदळे,आण्णा कोकाटे तुकाराम गायकवाड,गोविंद कोटूळे, दत्ता मेहेर,रोहिदास गोफणे,बुद्धीवान लटके,अतूल गोफणे,बुध्दीवान लटके,बाबुराव गायकवाड,अजहर शेख,चतूर्भुज जाधव यांच्या सह हाजारो महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी घोषणा बाजी करीत जल्लोष साजरा केला.

     मात मतमोजनी वेळी पोलीस निरीक्षक अमोद भुजबळ यांच्या मार्गदर्शना खाली सहाय्यक पोलीस निरीक्षक कवीता मुसळे यांच्या पोलिस पथकाने मत मोजनी केद्रांवर चोख बंदोबस्त ठेवला होता.

      या निवडनुकीची मत मोजणी प्रक्रिाया निवडनुक निर्णय अधिकारी कुमार बारकुल, सहाय्यक निवनुक निर्णय अधिकारी रवि गायकवाड यांच्या सह प्रशांत चंदणे,श्रीमती मयूरा मोरे,शिवराज ईतापे,पांडूरंग लांडे यांनी पारपाडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here