back to top
Monday, September 16, 2024
Google search engine
Homeदेश-विदेशबनावट कागदपत्रांच्या आधारे बनवण्यात आलेले 21031 सिम कार्डस दूरसंचार विभागाने केले रद्द

बनावट कागदपत्रांच्या आधारे बनवण्यात आलेले 21031 सिम कार्डस दूरसंचार विभागाने केले रद्द

 

बनावट कागदपत्रांच्या आधारे मिळवलेले फोनचे सीमकार्डस सायबर गुन्ह्यांसाठी वापरले जातात, हे तर उघड सत्य आहे. असे बनावट सीमकार्डस तयार करणारे लोक आता या गैरव्यवहारात इतके सरावले आहेत, की त्यांनी अशा प्रकारची बनावट ओळखपत्रे/ बनावट पत्ते दाखवणारी कागदपत्रे तयार केली आहेत, जी एकेक  प्रकरणापुरता तपास करताना , मानवी तपास पद्धतीत कधीही पकडली जाणार नाहीत. हे लक्षात घेऊन, दूरसंचार विभागाने, अशा कागदपत्रांच्या आधारे होणारे सायबर गुन्हे रोखण्याचे आव्हान हाती घेतले असून त्यासाठी अभिनव आणि स्वदेशी कृत्रिम बुद्धीमत्ता तंत्रज्ञान, ह्या संकल्पनेचा वापर करत त्या आधारावर, चेहऱ्याची ओळख पटवणाऱ्या फेशियल रेक्गनिशन पॉवर्ड सोल्यूशन (ASTR) ह्या अत्याधुनिक प्लॅटफॉर्मच्या मदतीने  बनावट सिम कार्डस शोधून काढली आहेत.

ASTR प्रकल्पामागचे उद्दिष्ट सर्व प्रकारच्या दूरसंचार सेवा प्रदात्यांच्या ग्राहकांचे एकत्रित विश्लेषण करणे, आणि विश्वासार्ह नसलेले मोबाईल क्रमांक ओळखून त्यातून ते वजा करण्याचे काम केले गेले. या सिस्टिममध्ये दूरसंचार कंपन्यांनी, दूरसंचार विभागाला दिलेल्या ग्राहकांचा डेटाबेस वापरुन, एकच चेहरा आणि त्याचे वेगवेगळे क्रमांक ओळखले जातात.

याच प्रणालीचा वापर करत, महाराष्ट्र एलएसएने दूरसंचार विभागाच्या ग्राहक डेटाबेसचे विश्लेषण केले आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे जारी केल्याचा संशय असलेले एकूण 21031 सिम ओळखून ती  रद्द केली गेली .

अशा फसव्या/बेकायदेशीर कारवायांमध्ये सहभागी असलेल्या दोषी लोकांवर आणि सिम विक्रेत्यांवर कारवाई करण्यात येत आहे. अशा PoS/सिम विक्रेत्यांना सेवा प्रदात्यांद्वारे आणि संपूर्णपणे काळ्या यादीत टाकले जात आहे. पुढील तपास करून दोषींवर आवश्यक कारवाई करण्यासाठी पोलिसांत तक्रार करण्यात येत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments