back to top
Thursday, November 21, 2024
Google search engine
Homeताज्या बातम्यामराठा उद्योजक तयार होण्यासाठी बँक ऑफ इंडियाबरोबर सामंजस्य करार

मराठा उद्योजक तयार होण्यासाठी बँक ऑफ इंडियाबरोबर सामंजस्य करार

 


सोलापूर,  :- अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून विविध योजनांच्या अंतर्गत राज्यामध्ये जास्तीत -जास्त मराठा उद्योजक तयार होण्यासाठी बँक ऑफ इंडीयाबरोबर सामंजस्य करार करण्यात आला आहे.

            बैंक ऑफ इंडियाच्या पुणे येथील विभागीय कार्यालयात दिनांक 8 मे 2023 सामंजस्य करार करण्यात आला. यावेळी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, विभागीय जनरल मॅनेजर राधाकांत बँक ऑफ इंडियाचे डेप्युटी जनरल मॅनेजर रवींद्र बोगा, डेप्युटी जनरल मॅनेजर लगणजीत दास, चीफ मॅनेजर समीर देशपांडे उपस्थित होते.

            बँकेच्या माध्यमातून व्यवसायासाठी कर्जावरचे व्याज अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या माध्यमातून दिले जाते. पुणे, कोल्हापूर, सोलापूर, नाशिक, रत्नागिरी. नागपूर संपूर्ण विदर्भ या भागासाठी करार करण्यात आला असून, कराराची अंमलबजावणी सुरु करण्यात आली आहे. महामंडळाच्या लाभार्थ्यांना CGTMSE व CGFMU या दोन क्रिएट गॅरंटी देण्यात येणार आहेत. जे तरुण क्रेडिट गॅरंटी च्या माध्यमातून कर्ज मागणी करतील त्यांना याचा लाभ देण्यात येईल. जास्तीत जास्त तरुणांनी महामंडळाच्या योजनांचा लाभ घेऊन, राज्यात उद्योजक होतील या दृष्टीने शासन आणि महामंडळ प्रयत्नशील असल्याचे अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी सांगितले.  सामजस्य कराराप्रमाणेच या अगोदर देखील मुंबई, मुंबई उपनगर, रायगड, ठाणे कोकण विभागासाठी या प्रकारचा करार करण्यात आला आहे. या पूर्वीच्या या कराराचा लाभ या विभागातील लाभार्थ्यांना झालेला आहे. मुख्यमंत्री एकनाथ  शिंदे , उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गर्शनाखाली राज्यात एक लाख मराठा उद्योजक होण्याच्या दृष्टीने या करारामुळे लाभ होणार असल्याची माहिती महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी दिली.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments