back to top
Sunday, January 26, 2025
Google search engine
Homeताज्या बातम्या१५ हजाराची लाच स्वीकारणारा वाशी येथील परिरक्षण भुमापक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

१५ हजाराची लाच स्वीकारणारा वाशी येथील परिरक्षण भुमापक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

  


धाराशिव -जमिनीची अकृषिक अतितातडी मोजणी करण्यासाठी १५ हजाराची लाच स्वीकारणारा वाशी येथील परिरक्षण भुमापक नामे सुनील श्रीराम रामदासी , वय 55 वर्षे, परिरक्षण भुमापक ( निमतानदार), भूमी अभिलेख कार्यालय वाशी, ज़िल्हा उस्मानाबाद ( वर्ग -3) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने ताब्यात घेतले आहे. 

याबाबत हकीकत अशी की,तक्रारदार यांनी त्यांच्या नावाने असलेल्या जमिनीची अकृषिक अतितातडी मोजणी करण्यासाठी भूमी अभिलेख कार्यालय, वाशी येथे अर्ज दाखल करून स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये चलन भरलेले होते. तक्रारदार यांच्या जमिनीच्या मोजणीसाठी  नोटीस काढून त्यांच्या जमिनीची अतितातडी मोजणी करून देण्यासाठी यातील आलोसे सुनील श्रीराम रामदासी, वय 55 वर्षे, परिरक्षण भुमापाक ( निमतानदार), भूमी अभिलेख कार्यालय वाशी यांनी  पंचांसमक्ष तक्रारदार यांच्याकडे 20000/- रुपये लाचेची मागणी करून तडजोडी अंती 15000/- रुपये लाच रक्कम पंचांसमक्ष स्विकारल्याने  आरोपी रामदासी यांना ताब्यात घेतले असुन पोलीस स्टेशन वाशी, ज़िल्हा उस्मानाबाद  येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालु आहे. 

लोकसेवक अथवा त्यांच्या वतीने कोणी खाजगी व्यक्ती कायदेशीर काम करून देण्यासाठी लाचेची मागणी करत असेल तर खालील नंबरवर संपर्क साधावा. कार्यालय 02472 222879 टोल फ्री क्रमांक.1064


आणखी वाचा

वडापाव चा शोध कोणी लावला?

उन्हाळी खोल नांगरणीचे महत्त्व

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments