परांडा (प्रतिनिधी)परांडा येथिल संत मीरा पब्लिक स्कूल व डॉ.वेदप्रकाश विद्यामंदिर या शाळेत संस्थापक डॉ प्रतापसिंह पाटील यांच्या संकल्पनेतून दरवर्षी प्रमाणे याही वर्षी ‘फन -फेअर ‘हा विध्यार्थ्यांच्या विविध कला -कौशल्याला वाव मिळावा हा मनोरंजनात्माक व आनंददायी उपक्रम अतिशय उत्साहत पार पडला.
यावेळी या ‘आनंद मेळाव्यात ‘एकूण २१२ विद्यार्थ्यांनी १०६ स्टॉल लावले होते.यामध्ये भाजीपाला,फळे,मसालेदार पदार्थ,सौंदर्य प्रसाधने,बाईक शोरूम,खेळ व खेळणी इ.ची अतिशय उत्कृष्ट मांडणी करून खूप मोठे मोठे आकर्षक स्टॉल लागले होते.विद्यार्थ्यांना व्यवहार कौशल्य,नेतृत्व गुण,मार्केटिंग स्किल,सवांद कौशल्य,संघटन कौशल्य समजावे व शिक्षणातून मनोरंजन व्हावे या हेतूने या ‘फन -फेअर ‘ उपक्रमाचे आयोजन केले होते.
यात विद्यार्थ्यांनी स्वतःचे कौशल्य दाखवत लाखो रुपयांची उलाढाल केली.या स्पर्धात्मक उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना १०० पैकी गुण देण्यात येणार आहेत, याबद्दल विद्यार्थ्यांना शाळेत या स्पर्धेचे प्रशिक्षण देण्यात आले होते.
या कार्यक्रमाचे उदघाटन संस्थाध्यक्ष डॉ.प्रतापसिंह पाटील, पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार,नायब तहसीलदार पांडुरंग माढेकर,माजी सभापती अनुजा दैन,सुचिता सिद्धेश्वर पाटील,अॅड.झहीर चौधरी, भोत्राच्या सरपंच उर्मिला पाटील, विस्तार अधिकारी सूर्यभान हाके, अशोक खुळे,अॅड.पै.विशाल देवकर,अजय खरसडे,डॉ. अब्बास मुजावर,एव्हरेस्ट देशमुख,जफर जिनेरी,इरफान शेख,समीर पठाण,जयदेव गोफने,शीतल खराडे,संजीवनी पाटील, बाळासाहेब गोडगे,पंजाब घाडगे, सागर ठाकूर,जावेद पठाण, प्राचार्य संतोष भांडवलकर आदी मान्यवरांच्या हस्ते झाले.यावेळी सर्व मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या सर्व स्टॉल ला भेटी देऊन कौतुक केले व आनंद घेतला.
मार्केट डे चे संयोजक म्हणून संतोष शेरे,विकास शेळके,राणी भिल्लारे,दादासाहेब गिरवले व सर्व सहकारी शिक्षक व कर्मचारी यांनी काम पहिले.निरीक्षक म्हणून विकास सुरवसे व सुमित कोकाटे यांनी काम पाहीले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुराधा गव्हाळे यांनी केले.
या कार्यक्रमासाठी दिवसभरातून परंडा व तालुक्यातील अनेक पालक व शिक्षण प्रेमी नागरीकांनी भेटी देऊन विद्यार्थ्यांचा उत्साह वाढवून कौतुक केले.