धाराशिव – तुळजापूर येथील श्री तुळजाभवानी मंदिरात येणाऱ्या भाविकांनी हाफ पँट, बर्मुडा, उत्तेजक कपडे घालू नये अश्या आशयाचे फलक झळकले होते. याबाबत मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांना कोणतेही निर्बंध नाहीत प्रशासनाने खुलासा केला होता. तदनंतर आज तुळजाभवानी देवी मंदिरात येणाऱ्या भक्तांच्या कपड्यावर निर्बंध घातल्याच्या बॅनर बाबत तुळजापूर मंदिर संस्थांनच्या धार्मिक व्यवस्थापक नागेश शितोळेंना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. ही डिजीटल बॅनर लावणेपुर्वी आपण वरिष्ठांची कोणतीही पुर्व परवानगी घेतल्याचे निदर्शनास आले नाही. अथवा या बाबत वरिष्टांना पूर्व सुचना दिल्या नाहीत, ही अत्यंत गंभीर स्वरुपाची बाब आहे. तरी या बाबत आपला लेखी खुलासा ही नोटीस मिळालेपासून ४८ तासाचे आत निम्नस्वाक्षरीतांकडे सादर करावा. खुलासा असमाधानकारक असल्यास अथवा मुदतीत प्राप्त न झाल्यास आपले विरुध्द प्रशासकीय कारवाई प्रस्तावित करण्यात येईल असे नोटीस मध्ये म्हटले आहे.