धाराशिव दि.२८ (प्रतिनिधी) – देशात खास पत्रकारांच्या विविध समस्यावर काम करणाऱ्या व्हाईस ऑफ मीडिया या राष्ट्रीय पत्रकार संघटनेच्या रेडिओ विंगच्या धाराशिव जिल्हाध्यक्षपदी रमेश पेठे यांची निवड करण्यात आली आहे.ही निवड व्हॉइस ऑफ मीडिया रेडिओ विंगचे प्रदेशाध्यक्ष इरफान सय्यद यांनी एका पत्राद्वारे केली आहे. दिलेल्या पत्रात असे नमूद करण्यात आले आहे की,रेडिओ पत्रकारांच्या आणि पत्रकारितेच्या सर्वांगीण विकासासाठी आपण काम करणार आहोत. मूल्याधारित पत्रकारिता ही विचारधारा कायम राहावी. ज्या पत्रकारितेच्या जीवावर या सृष्टीचा डोलारा चालतो,ती पत्रकारिता शाबूत राहावी, सुरक्षित राहावी, यासाठीच आपण काम करणार आहोत. आपल्यावर दिलेली जबाबदारी आपण पार पाडाल, ही अपेक्षा व्यक्त करीत पुढील कामास गती द्यावी. तसेच पेठे यांचे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहे.