पुणे शहराचा सर्वांगीण विकास करणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

0
59
·         क्रीडा महर्षी बाबुलाल झंवर क्रीडा संकुलाचे उद्घाटन
·         सुरेश अंबादास गुजराथी व्यायाम शाळेचे उद्घाटन
·         क्रीडाप्रेमींची झाली सोय
पुणे, दि. 4 : पुणे शहरात अनेक चांगल्या गोष्टी असून विविध प्रकल्पाच्या माध्यमातून पुणे शहराचा सर्वांगीण विकास करणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केले.
            बिबवेवाडी ओटा येथील प्रभाग क्रमांक 71 मधील क्रीडा महर्षी बाबुलाल प्रेमलाल झंवर क्रीडा संकुल व सुरेश अंबादास गुजराथी व्यायामशाळेचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी श्री. फडणवीस बोलत होते. यावेळी पालकमंत्री गिरीश बापट, खासदार अनिल शिरोळे, खासदार संजय काकडे, आमदार माधुरी मिसाळ, नगरसेविका मानसी देशपांडे, नगरसेवक सुनिल कांबळे उपस्थित होते.
            मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, स्मार्ट सिटी, पुणे मेट्रोसह विविध प्रकल्पाच्या माध्यमातून पुणे शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी सरकार प्रयत्नीशल आहे. येत्या काळात पुणे शहरात अनेक चांगले प्रकल्प आणून पुणे शहराचा चेहरामोहरा बदलण्याचा आमचा संकल्प आहे. या ठिकाणी उभारण्यात आलेल्या क्रीडा संकुलाच्या माध्यमातून या परिसरातील क्रीडा प्रेमींची चांगली सोय झाली आहे. या सुविधेचा क्रीडा प्रेमी नागरीकांनी लाभ घ्यावा. या ठिकाणी काम करत असलेल्या नगरसेवकांचे काम चांगले आहे. या नगरसेवकांच्या माध्यमातून यापुढेही या परिसराचा विकास होत राहील, असा विश्वास श्री. फडणवीस यांनी व्यक्त केला.
            या कार्यक्रमाला परिसरातील क्रीडा प्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here