back to top
Friday, November 22, 2024
Google search engine
Homeताज्या बातम्यावृक्ष लागवडी सोबत रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी पण जनजागृतीचे काम करावे - सहआयुक्त...

वृक्ष लागवडी सोबत रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी पण जनजागृतीचे काम करावे – सहआयुक्त विश्वास मुंडे

          सातत्याने पर्जन्यमानाचे कमी होत असलेले प्रमाण हे चिंताजनक बाब असून त्यामुळे पडत असलेल्या पावसाचे पाणी जास्तीत जास्त प्रमाणात रेन वॉटर हार्वेस्टिंग करून जमिनीत जिरवण्यासाठी काम करावे असे मत आयकर विभाग औरंगाबाद चे  सहआयुक्त विश्वास मुंडे यांनी व्यक्त केले. एकता फाउंडेशन आणि अन्नपुर्णा ग्रुप उस्मानाबाद यांच्या वतीने मारवाड गल्‍ली येथे आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात ते बोलत होते
          यावेळी उस्मानाबाद जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आर. राजा , उस्मानाबाद नगरीचे नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर,आई गोशाळेचे अध्यक्ष सतीश सोमानी, अन्नपूर्णा ग्रुपचे अध्यक्ष अतुल अजमेरा, एकता फाउंडेशनचे अध्यक्ष अमित कदम, पी. के. मुंडे, प्रशांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती
          नेमक्या समस्या समजून काम केल्यास उत्तर लवकर मिळते आणि काम करण्यास सोपे होते. वृक्ष लागवडी सोबत पर्यावरण जनजागृतीसाठी एकता फाउंडेशन आणि अन्नपुर्णा ग्रुप उस्मानाबाद करत असलेले काम कौतुकास्पद असून पर्यावरणाची काळजी आपण घेतली तर पर्यावरण पण आपली काळजी घेईल असेही मत यावेळी विश्वास मुंडेंनी व्यक्त केले.
          जास्तीत जास्त वृक्ष लागवड करून आपले उस्मानाबाद हिरवेगार करण्यासाठी सर्वांनी सहकार्य व सहभाग घ्यावा व यासाठी पोलिस प्रशासनाच्या वतीने पण सर्वतोपरी सहकार्य करण्यात येईल असे मत पोलीस अधीक्षक आर. राजा यांनी व्यक्त केले. पुढे बोलताना त्यांनी वृक्ष लागवड सोबत वृक्ष संवर्धन ही महत्त्वाचे असून जास्त प्रमाणात वृक्ष लागवड केल्यास सध्याची दुष्काळी परिस्थिती बदलण्यास वेळ लागणार नाही असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. माणूस बदलू शकतो पण वृक्ष बदलत नाही त्यामुळे वृक्ष लागवडीचा आपणांस फायदाच असुन कोणत्याही प्रकारचे नुकसान आपले होत नाही असे ही मत यावेळी आर. राजा यांनी व्यक्त केले.
          शासनापेक्षा वृक्ष लागवडी मध्ये नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा असून सर्वसामान्य नागरिकांने वृक्ष लागवड केल्यास त्या वृक्षाप्रती प्रेमाची भावना त्या व्यक्ती कडे असते त्यामुळे वृक्षसंवर्धन करण्यास मदत होते. वृक्ष लागवड जास्त प्रमाणात व्हावी या उद्देशाने  या वर्षी उस्मानाबाद नगरपालिका मधून प्रत्येक व्यक्तीला दोन झाडे देण्यात येणार असून ज्यांना वृक्ष हवे आहेत त्यांनी नगरपालिकेमधून वृक्ष घ्यावेत असे आवाहनही यावेळी नगराध्यक्ष मकरंद राजेनिंबाळकर यांनी केले.
         यावेळी आई गोशाळा चे अध्यक्ष सतीश सोमाणी यांना गोरक्षण व गोसंवर्धन साठी गोरत्न पुरस्कार मान्यवरांचे हस्ते देऊन गौरविण्यात आले.
          कार्यक्रमाची प्रस्तावना अतुल अजमेरा व आभिलाष लोमटे यांनी केले तर आभारप्रदर्शन कुणाल गांधी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिलाष लोमटे यांनी केले
          यावेळी जितेंद्र खंडेरिया,मनोज कोचेटा, विशाल थोरात, अमर चांडक, हरीश सारडा,  रोहन चौहान, अमित अजमेरा, अभय कोचेटा, प्रशांत बोराणा, अँड. विश्वजीत शिंदे, अभिमान हंगरगेकर,अनुप बांगड, प्रसाद देशमुख, केदार लगदिवे, किरण वारे पाटील, सचिन बारस्कर, सचिन बांगड,आदित्य लगदिवे, अक्षय गांधी, मुजाहिद सिद्दिकी, रोहित सहाने व  अन्नपूर्णा ग्रुप,एकता फाऊंडेशनचे सर्व सदस्य उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments