तुळजापूर विधानसभेसाठी इच्छुकांची भाऊगर्दी रोहन देशमुखांना ताटकळवलं! नुतन प्रदेशाध्यक्षांच्या उपस्थितीत भाजपचा कार्यकर्ता मेळावा

0
111

उस्मानाबाद – महसूलमंत्री तथा भाजपचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात अनेकांनी पक्षप्रवेश केला, मंचावर विधानसभेसाठी इच्छुकांनी केलेल्या भाऊगर्दीने सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचे सुपुत्र रोहन देशमुख यांना काही वेळ मंचावर बसण्यासाठी जागा न मिळाल्याने ताटकळत उभारावे लागल्याने रोहन देशमुख समर्थकांत काही काळ नाराजी होती.

महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत तुळजापूर येथे कार्यकर्ता मेळावा पार पडला. विधानसभेसाठी इच्छुक असणाऱ्या अनेकांनी यावेळी पक्षात प्रवेश केला. अनेकांनी बॅनरबाजी करत प्रदेशाध्यक्षांसमोर शक्तिप्रदर्शन केले मात्र चंद्रकांत पाटील यांनी उमेदवार कोणीही असो निष्ठेने काम करण्यास तयार रहाण्याचे आदेश दिल्यानंतर इच्छुकांच्या चेहर्‍यावरचा नुर बदलला. तत्पूर्वी  रोहन देशमुख गेल्या अनेक महिन्यांपासून तालुक्यात सक्रिय आहेत. तालुक्यासाठी त्यांनी चांगला निधी आणला आहे. लोकमंगलच्या माध्यमातून त्यांनी अनेक कामे केली आहेत. तुळजापूर विधानसभा मतदारसंघात भाजपचे जाळे विणन्यात त्यांचे योगदान आहे. असे असताना देखील पक्षाच्या कार्यक्रमात त्यांना बसण्यासाठी योग्य स्थान दिले गेले नाही. शेवटी एका कार्यकर्त्याने मागल्या रांगेची खुर्ची दिल्यानंतर त्यांनी आसन ग्रहण केले मात्र पक्षात येत असलेले नविन कार्यकर्त्यांच्या प्रवेशावेळीही त्यांनी खुर्ची न सोडल्याने तसेच एकाही प्रवेशावेळी ते जागेवरून न उठल्याने उलट-सुलट चर्चेला उधाण आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here